Sand Extraction 
सोलापूर

अवैध वाळू उपसा करणाऱ्या पाच ट्रॅक्‍टरचालकांविरुद्ध "या' पोलिसांची कारवाई 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा आणि चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सरकोली (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून चोरून वाहतूक केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी सहा ब्रास वाळूसह 24 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाळू वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्‍टर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई गुरुवारी (ता. 2) दुपारी एकच्या सुमारास करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा पोलिस हवालदार बापूसाहेब मोरे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी राज्य सरकारने भीमा नदीपात्रातून वाळू उपसा आणि वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही कायद्याची पायमल्ली करत नदीकाठच्या अनेक गावांमधून सध्या राजरोसपणे वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन आणि संचारबंदी असतानाही भीमा नदी आणि माण नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी सुरू आहे. गुरुवारी (ता. 2) दुपारी सरकोली येथे भीमा नदीपात्रातून दिवसाढवळ्या वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सरकोली येथे जाऊन कारवाई केली. कारवाईदरम्यान भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या एमएच - 45 एफ - 8263, एमएच - 13 एजे- 5236, न्यू हॉलंड कंपनीचा एमएच-13 सीएस-5770, एमएच 13- एजे- 0080, एमएच 13 - एजे 736 या पाच ट्रॅक्‍टर ट्रॉलींमधून 30 हजार रुपये किमतीची सहा ब्रास वाळूची चोरून वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. संशयित आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, सरकोली गावाच्या शिवारातील भीमा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा केल्याचे त्यांनी सांगितले. 

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल 
ट्रॅक्‍टर चालक दिंगबर तानाजी कराळे, बाहुबली शरद भालेराव, नितीन पोपट भोसले, संदीप सुरेश हाबळे (सर्व रा. सरकोली) सुभाष रामचंद्र नवले (रा. ओझेवाडी) या पाच जणांवर अवैध वाळू उपसा व चोरी केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT