सोलापूर

मोठी ब्रेकिंग ! अहोरात्र मेहनत करुनही पोलिसांना 75 टक्‍केच वेतन

तात्या लांडगे
सोलापूर : कोरोनाचे वैश्‍विक संकट राज्यातून हद्दपार व्हावे, महाराष्ट्रातील जनता सुरक्षित राहावी म्हणून आपला जीव धोक्‍यात घालून अहोरात्र रस्त्यांवर गस्त घालणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना 100 टक्‍के वेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. मात्र, त्यांना 75 टक्‍केच वेतन मिळणार असून त्यानुसार पगार बिल मागविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

हेही नक्‍की वाचा : सोलापुरकरांनो घाबरु नका ! सोलापुरात नाही एकही कोरोनाबाधित रुग्ण


राज्य सरकारला 2019-20 मध्ये मार्चएण्डपर्यंत तीन लाख 14 हजार कोटींपर्यंत महसूल जमा होणे अपेक्षित होते. राज्यातील सुमारे साडेसहा लाख शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी त्यातील एक लाख 13 हजार कोटींची रक्‍कम दरवर्षी खर्च होते. मात्र, राज्यातील लॉकडाउन आणि कोरोनाचे वैश्‍विक संकट राज्यातून हद्दपार करण्यासाठी होणारा मोठा खर्च, या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या तिजोरीत यंदा खडखडाट झाला आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्यांशिवाय अन्य विभागांमधील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे टप्पे करण्यात आले आहेत. बहूतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळू शकलेले नाही. दुसरीकडे लॉकडाउनचे पालन तंतोतंत व्हावे, कोरोनाचा शिरकाव राज्यात वाढू नये, यासाठी स्वत:च्या कुटुंबियांना लॉकडाउन करुन रस्त्यांवर अहोरात्र ड्यूटी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना 100 टक्‍क्‍यांऐवजी 75 टक्‍केच वेतन देण्याचा निर्णय सरकारने गुपचूप घेतला. त्यानुसार आता जिल्हानिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची 75 टक्‍केप्रमाणे वेतन बिले मागवून घेण्यात आल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळ शी बोलताना सांगितले.

हेही नक्‍की वाचा : मास्क न घातल्याने राज्यात पहिला गुन्हा दाखल


75 टक्‍क्‍यांप्रमाणे मागविली वेतन बिले
राज्याच्या गृहविभागाच्या निर्देशानुसार सोलापूर ग्रामीणमधील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 75 टक्‍केप्रमाणे वेतन बिल पाठविण्यात आले आहे. कपात केलेली 25 टक्‍के रक्‍कम संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना नंतर मिळणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. तर वास्तविकपणे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा 7 तारखेपर्यंत बॅंकेच्या खात्यात वितरीत केले जाते. मात्र, मार्चएण्डमुळे मागील महिन्यातील वेतन आणखी झालेले नाही. काही दिवसांत 75 टक्‍क्‍यांप्रमाणे वेतन मिळेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे पोलिस आयुक्‍तालयातील एका महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले.

हेही नक्‍की वाचा : धक्‍कादायक ! लॉकडाउनंतरही 11 जणांनी गाठले ग्वाल्हेर : एकजण पॉझिटिव्ह


आरोग्य विभागालाही 75 टक्‍केच वेतन
आरोग्य विभागातील वर्ग एक व दोनमधील अधिकाऱ्यांना 75 टक्‍क्‍यांप्रमाणे वेतन दिले जाईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्यांना 100 टक्‍के वेतन मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले होते. आता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना तरी 100 टक्‍के वेतन मिळेल, अशी अपेक्षा आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. शितलकुमार जाधव यांनी व्यक्‍त केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

Maharashtra Politics : भेटींना राजकीय रंग देऊ नका; महायुती भक्कम असल्याचा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा इशारा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

RBI Rule: बँकेच्या चुकीमुळे तुमचे नुकसान झाले? मग ग्राहकांना मिळू शकते 33 लाखांपर्यंत नुकसान भरपाई; जाणून घ्या नियम

IND vs ENG: विराट मोडणार सचिन तेंडुलकरचा १९ वर्षांचा जुना रेकॉर्ड? जे कोणालाच जमलं नाही ते विराट करणार, पाहा नेमकं काय घडणार

SCROLL FOR NEXT