The pomegranate of Madhukar Jadhav a farmer from Bondle has got Geographical Indication rating  
सोलापूर

मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल; विशिष्ट पद्धतीनं तयार केलेल्या डाळींबाला जीआय मानांकन

दिनेश देशमुख

बोंडले (सोलापूर) : विविध औषधी गुणांनीयुक्त असलेले डाळिंब हे भौगोलिक वातावरणात एका विशिष्ट पध्दतीने बनविले गेल्यामुळे तसेच त्याला विशेष दर्जा व गुण प्राप्त झाले आहे. बोंडले (ता.माळशिरस) येथील प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच मधुकर तुकाराम जाधव यांच्या डाळिंबाला जीओग्राफिकल इंडिगेशन (जी.आय.) मानांकनाची मोहर लागली आहे. यामुळे आता जी.आय.टॅगचे हे डाळिंब जगाच्या बाजारपेठेत आपला तोरा मिरवणार आहे.

कोरडवाहू जिल्हा म्हणून ख्यात असलेला सोलापूर जिल्ह्याने आता फळबागांचा जिल्हा म्हणून अलीकडे नाव कमावले आहे. त्यातल्या त्यात डाळिंबांमध्ये विशेष प्रगती केली आहे. जिल्ह्यातील कोरडं हवामान हे फळांच्या चवीसाठी अत्यंत पोषक असून, कमी पाण्यात येथील शेतकरी फळ बागांची लागवड करीत आहेत. याप्रमाणे बोंडले येथील प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच मधुकर तुकाराम जाधव यांनी आपले पाच एकर डाळिंब नैसर्गिकरित्या पिकवून भारत सरकारचे जीओग्राफिकल इंडिगेशन (जी.आय.) मानांकन प्राप्त केले आहे. फळाचा आकर्षक आकार, तजेलपणा, रंग व कसलाही डाग नसलेले हे जी.आय.मानांकन डाळिंब सातासमुद्रापार युरोपियन राष्ट्रात विक्री करीता नेता येणार आहे.

भारत सरकारच्या वतीने जीओग्राफिकल इंडिगेशन रजिस्ट्रीमार्फत देण्यात येणारे जी.आय.मानांकन प्रमाणपत्र डाळिंब बागायतदार मधुकर जाधव यांना वेळापूर येथे झालेल्या 'सोलापूर डाळिंब' या भौगोलिक चिन्हांकन /मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांचे प्रसार व प्रसिद्धीसाठी प्रशिक्षण व अधिकृत वापरकर्ता नोंदणी अभियानात देण्यात आले. यावेळी कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक प्रशांत सुर्यवंशी, जिल्हा कृषी अधिकारी रविंद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, फलोत्पादन व औषधी मंडळाचे राज्यस्तरीय सल्लागार गोविंद हांडे, कृषी पणन मंडळ, पुणेचे व्यवस्थापक सतिश वराडे, कृषी सहाय्यक अधिकारी मुग्धा भातलवंडे व परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

जी.आय.मानांकनामुळे डाळिंबाचे मार्केटिंग करणे सोपे जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशेष महत्त्व असणार आहे. तसेच गुणवत्तेमुळे ग्राहकांची मागणी वाढणार आहे. परिणामी डाळिंबाला जादा दर मिळेल.
- मधुकर तुकाराम जाधव, डाळिंब उत्पादक शेतकरी व माजी सरपंच बोंडले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीन अन् रशियाकडून अणुचाचण्या सुरु असल्याचा ट्रम्प यांचा दावा; पाकिस्तानचंही घेतलं नाव, चीनकडून प्रत्युत्तर

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

World Youngest Billionier : वयाच्या 22 व्या वर्षी अब्जाधीश! भारतीय वंशाच्या दोन तरुणांसह तीन मित्रांची अविश्वसनीय कामगिरी

Nashik News : कोवळ्या वयासाठी 'बोल्ड' विषय नको! नाट्य संघांच्या मागणीनुसार हौशी मराठी नाट्यस्पर्धेत लहान मुलांना प्रवेश नाही

Dev Deepawali 2025 Travel Tips : देव दिवाळीला वाराणसीला जाऊ शकत नाही? मग भेट द्या 'या' अद्भुत ठिकाणांना

SCROLL FOR NEXT