nota1.jpg 
सोलापूर

छंदातून प्रमोद कामतकरांनी केला रंजक इतिहास सांगणाऱ्या नोटा व नाण्यांचा संग्रह !

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः चलनात येणाऱ्या नोटा व नाणी काही काळानंतर वापरातून जातात. मात्र या नोटा व नाणी संग्रहीत केली तर या चलनातील अनेक रंजक गोष्टीच्या माहितीला उजाळा मिळतो. येथील पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये विशेष सहायक म्हणून कार्यरत असलेले प्रमोद कामतकर यांनी छंद म्हणून अनेक प्रकारचे वेगळे संदर्भ, क्रमांक, इतिहास असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चलनी नोटा व नाण्याचा संग्रह केला आहे. नोटांच्या छपाईतील अनेक टप्पे व घटना अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यातून झाला आहे. . 

चलनात येणाऱ्या नोटा अनेक वैशिष्ट्यांनी ओळखल्या जातात. नोटांवरील क्रमांक, मिस प्रिंट, विशिष्ट क्रमाचे आकडे आणि दुर्मिळ अशा कितीतरी वैशिष्ट्यांनी प्रमोद कामतकर यांच्या नोटांचा संग्रह सजला आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी जपलेला नोटांचा संग्रह वैविध्यपूर्ण आणि आकर्षक असा आहे. 
येथील प्रमोद कामतकर हे पंजाब नॅशनल बॅंक मध्ये विशेष सहाय्यक म्हणून काम करतात. बॅंकेमध्ये काम करत असताना चलनाचा अभ्यास सहजपणे त्यांनी केला. बॅंकेमध्ये येणाऱ्या चलनी नोटांचे प्रकार व नाण्यांचे प्रकार याबाबत त्यांनी आवड म्हणून निरीक्षणाचा छंद जपला. या निरीक्षणातून त्यांनी काही विशेष प्रकारच्या नोटांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. विविध नोटांमध्ये अनेक प्रकार त्यांना आढळले. 

पूर्वी उपलब्ध झालेली दोन रुपयाची लाल रंगाची नोट त्यांच्या संग्रहात आहे. पाच रुपयाची जुन्या प्रकारची नाणी त्यांनी संग्रहीत केली. मध्यंतरी पाच रुपयाचे एक जड नाणे निघाले होते. तेही त्यांनी जतन केले. एक रुपयाचे जड नाणी, कमी वजनाची नाणी व निळ्या रंगाची नोट त्यांच्याकडे आहे. दहा रुपयाच्या नोटी मध्ये नवीन आणि जुन्या नोटा पाहण्यास मिळतात. जुनी नोट मोठ्या आकाराची होती मात्र नंतर निघालेली दहा रुपयाची नोट लहान आकाराची होती. मध्यंतरीच्या काळात अत्यंत कमी संख्येने आलेल्या वीस रुपयाच्या पिवळ्या रंगाची नोट या संग्रहात पाहण्यास मिळते. 
काही नोटांच्या नमुन्यामध्ये या नोटांचे विशिष्ट क्रमांक देखील आढळतात. त्यामध्ये छपाई मधील पहिल्या क्रमांकाची नोट व विशिष्ट क्रमाने असलेल्या क्रमांकाच्या सलग नोटा पाहण्यास मिळतात. एखाद्या नोटेच्या उत्पादनास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या क्रमांकाची नोट एक क्रमांकाने छापलेली दिसते. पहिल्या क्रमांकाची नोट त्यांनी जपली आहे. तसेच 786 या क्रमांकाची नोट देखील त्यांनी जतन केली आहे. याशिवाय क्रमांकाच्या क्रमवारीची पुनरावृत्ती होणाऱ्या नोटाही त्यांनी जपल्या. 
नाण्यांमध्ये जुन्या काळी वापरला जाणारा तांबडा पैसा त्यांच्याकडे पाहण्यास मिळतो. याशिवाय दोन पैसे, तीन पैसे, पाच पैसे अशी पैशांची नाणी देखील त्यांनी आवर्जून संग्रहात ठेवली. वर्ष 2001 पासून त्यांनी हा वैशिष्ट्यपूर्ण नोटा आणि नाण्यांचा संग्रह केलेला आहे. मध्यंतरी काही नोटा मिस प्रींट झाल्यातर त्याचे उत्पादन थांबवले जाते. या प्रकारच्या नोटा देखील त्यांनी जपल्या आहेत. काही नोटांमध्ये क्रमांकाची चूक झाली तर स्टार चे चिन्ह टाकून नोट छापली जाते. अशीही नोट त्यांनी संग्रहात ठेवली आहे. मागील दहा वर्षापासून त्यांनी केलेला हा संग्रह अत्यंत आगळा वेगळा ठरला आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT