AHILYADEVI VIDYPEETH.jpg
AHILYADEVI VIDYPEETH.jpg 
सोलापूर

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे स्मारक शासकीय निधीतूनच व्हायला हवे: कोणी केली मागणी ? ते वाचा 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक लोकवर्गणीतून करण्याचा घाट घातला जात आहे. हे स्मारक शासकीय निधीतून झाले पाहिजे अशी भूमिका धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी मांडली आहे. . 

विक्रम ढोणे यांनी आज सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याकडे लक्ष वेधले आहे. 

गेले दोन अडीच महिने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रस्तावित स्मारकासंदर्भात राज्यभरातील धनगर समाजामध्ये चर्चा आहे. धनगर समाजाच्या लोकवर्गणीतून स्मारक उभा करण्याचे नियोजन केले जात आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटाकाळात सर्वजण अस्तित्वाची लढाई लढत असताना अत्यंत घाईगडबडीने स्मारक समिती स्थापन करून मनमानी पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जात आहे. काहींनी आक्षेप घेतल्यानंतर दोनवेळा या समितीचा विस्तार करण्यात आला आहे. पहिल्या समितीत विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्राबल्य होते. त्यावेळी राज्य सरकारच्या यंत्रणेला पुर्णपणे बाजूला ठेवण्यात आले होते. नंतर पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना समितीत घेण्यात आले. तसेच इतर पक्षांचे लोकही घेण्यात आले आहेत. 
हे या स्मारकाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात वाईट प्रघात पाडत असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. जनतेची आर्थिक ससेहोलपट सुरू असताना लोकवर्गणी काढून स्मारक पुर्ण करण्याचा घाट घातलेला आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्‍यक आहे असे ढोणे यांनी म्हटले आहे. 
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक हे विद्यापीठ स्वनिधी किंवा राज्य शासनाच्या निधीमधूनच तयार करावे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या प्रस्तावाला तातडीने मंजूरी द्यावी. यासंदर्भात होत असलेल्या दिरंगाईची चौकशी व्हावी. विद्यापीठाला पायाभूत सुविधा तसेच मनुष्यबळासाठी आवश्‍यक तरतूद करावी. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना स्मारक समितीतून तातडीने वगळण्यात यावे या चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. ज्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवीं यांनी लोकोद्धारासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले. त्यांच्या स्मारकांसाठी विद्यापीठ अथवा महाराष्ट्र शासनाकडे निधी नाही, हा प्रकार लांच्छनास्पद आहे. त्यामुळे राज्य शासनाने याप्रश्नी तातडीने हस्तक्षेप करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा श्री. ढोणे यांनी दिला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT