आमदार समाधान आवताडे
आमदार समाधान आवताडे sakal
सोलापूर

सोलापूर : मंगळवेढ्यातील अवैध व्यवसायांचा प्रश्‍न पोहचला विधानसभेत

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी होऊन पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या आमदार आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्‍यातील अवैध धंद्याचा प्रश्‍न मांडला. विधी मंडळाचा कामकाजात नवखे असलेल्या आमदार आवतोडे यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत तालुक्‍यातील अवैध धंद्याबरोबरच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावर जोरदार प्रहार केला. (question of illegal trades in mangalveda reached the assembly)

मंगळवेढा शहर व तालुक्‍यामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यामध्ये दारू, जुगार, मटका, गुटखा, अवैध वाहतूक, आधी जवळपास 800 पेक्षा अधिक अवैध व्यवसाय सुरू आहेत. या अवैध व्यवसायकांकडून हप्ते गोळा केले जात असून यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत बोलताना केला. पोलिसांचे अवैध व्यवसायिकांशी असलेल्या आर्थिक लागेबांधीमुळे अवैध वाळू वाहतूकीवर कारवाईस गेलेल्या पोलिसाला आपला जीव गमवावा लागला होता. याचा देखील मुद्दा त्यांनी विधानसभेत उपस्थित केला. परंतु विधीमंडळाच्या कामकाजात आमदार आवताडे नवखे असून त्यांचे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव नाही. पोलिसाच्या निष्क्रियेतचा पाढा वाचत असताना आपल्या सहकारी आमदाराची बाजू विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उचलून धरली. आमदार आवताडे बोलत असताना हस्तक्षेप करत तालुक्‍यातील अवैध व्यवसायिकांबाबत आपण गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याकडे देखील तक्रार केली असल्याचे सांगितले. विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत तालुक्‍यातील अवैधधंद्याबाबत त्यांनी देखील जोरदार प्रहार केला.

प्रत्युत्तरादाखल गृहमंत्री शंभूराजे देसाई यांनी या पोलिस खात्याची पाठराखण करीत उपविभागीय पोलिस अधिकारी हे नव्याने आले असून नऊ महिन्यांपासून त्यांनी पदभार घेतला आहे. ऑक्‍टोबरमध्ये 619 व नोंव्हेबरमध्ये 672 सर्वाधिक अवैध व्यवसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे ते गुन्हेगारी व्यवसायिकांना पाठीशी घालतात, असे म्हणता येणार नाही. मंत्री अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देणारा असेल तर या प्रकरणी चौकशी कोण करणार असा सवाल विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी उपस्थित केला. यापूर्वी त्यांची चौकशी करण्यात आली त्या चौकशीत काही सिध्द झाले नाही तरी देखील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगत सोलापूर परिसरामध्ये दौऱ्यावर आले असता या पोलिस ठाण्याला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत आमदार आवताडे यांनी अवैध धंद्यावर प्रश्न उपस्थित केला असता विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी देखील तितक्‍याच ताकदीने त्यांना पाठबळ दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT