bjp raktdan shibir.jpg
bjp raktdan shibir.jpg 
सोलापूर

भाजपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद 

प्रमोद बोडके

सोलापूरः पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व डॉ किरण देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. 

यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे, महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महिला प्रभारी शैला मुळक, आमदार विजयकुमार देशमुख, सरचिटणीस बिजू प्रधाने, संजय कोळी, श्रीनिवास दायमा, नगरसेवक डॉ किरण देशमुख, अमर पुदाले, विनायक विटकर, प्रशांत फत्तेपुरकर,प्रविण दर्गोपाटील, मंडळ अध्यक्ष सचिन कुलकर्णी सुधाकर नराल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिरास सुरूवात करण्यात आली. 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. भाजप सोलापूर शहर उत्तरच्या वतीने आज आमदार विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडे चौकातील संपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना महामारी चा वाढत चाललेला फैलाव व रुग्ण संख्या लक्षात घेऊन तसेच रक्ताचा भासत असलेला तुटवड्याच्या अनुषंगाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये सव्वाशे रक्तपिशव्यांचे संकलन झाले. या रक्तदान शिबिरास भैय्या बनसोडे, राम वाकसे, लक्ष्मीकांत गड्‌ड्‌म, विजय वडेपल्ली, स्मिता भावे, शोभा नष्टे, मोहिनी पत्की, राजू पाटील, ज्ञानेश्वर कारभारी, राजाभाऊ काकडे, राजू आलुरे, जग्गू अळ्ळीमार, संतोष पवार, संजय कणके, शंकर शिंदे, विनायक विटकर, अजित भाऊ गायकवाड, विनोद मोटे, प्रवीण कांबळे, जगन्नाथ चव्हाण, विष्णू बरगंडे, हरिकांत सरवदे, प्रसाद कुलकर्णी, यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरास सिव्हील हॉस्पिटल रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभले.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT