Rasta Block
Rasta Block 
सोलापूर

"या' बागायती पट्ट्यात सापडला कोरोनाबाधित; मुख्य रस्ता बंद केल्याने शेती उत्पन्नावर परिणामाची भीती 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍याच्या पूर्व भागातील बागायती पट्ट्यात कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली असतानाच, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क बोराळे ते सिद्धापूर हा मुख्य रस्ता बंद करून टाकला आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यामुळे त्याचा शेती उत्पन्नावर परिणाम होणार आहे. 

मार्चपासून प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याची सूचना दिली होती. अशा परिस्थितीत बोराळे येथील रुग्ण त्याच्या बॅंक कामासाठी सोलापूर येथे गेला होता. तो तिथे कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्याला त्रास होऊ लागला. त्याचा स्वॅब घेऊन टेस्ट केली असता त्याचा चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या भागात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलत त्याच्या संपर्कातील 10 लोकांना क्वारंटाइन केले. 

सिद्धापुरातून जिल्ह्यातील जवळपास 11 पेक्षा अधिक साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केला जातो. असे असताना सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नवीन ऊस लागवडीसाठी व ऊस पिकाच्या जोपासनेसाठी अत्यावश्‍यक असलेल्या खते व बियाणांच्या गाड्या याच मार्गावरून ये-जा करीत असतात. परंतु, कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने हा रस्ता आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. परिणामी, खते व बियाणांच्या गाड्या अडकून पडल्या. भीमेच्या पूर्व भागातही रुग्ण सापडल्यामुळे वडापूरची वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली. यामुळे आता दुहेरी संकटात सिद्धापुरातील शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी येणारी पिके वाया जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही 

याबाबत सिद्धापूरचे शेतकरी अनिल बिराजदार म्हणाले, बोराळे - सिद्धापूर हा मुख्य मार्ग सुरू ठेवणे आवश्‍यक आहे. त्यामुळे आमच्या शेतीसाठी आवश्‍यक असलेली खते व बी-बियाणे वेळेत मिळू शकतील; अन्यथा याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे. ग्रामस्थांनी आवश्‍यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून हा मुख्य रस्ता खुला करावा. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT