Ambulance 
सोलापूर

जेव्हा पत्रकारालाच मिळते तब्बल तीन तासांनी रुग्णवाहिका..! 

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : अनेकांना अडचणीच्या काळात मदतीचा हात देणारे ग्रामीण पत्रकारही आता कोरोनाच्या अडचणीत सापडलेत. वैराग (ता. बार्शी) येथील एका ज्येष्ठ ग्रामीण पत्रकाराला अस्वस्थ वाटू लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता, पुढील उपचारासाठी त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बार्शी येथे पाठविण्याचा सल्ला दिला. पण तब्बल तीन तासांनी 108 रुग्णवाहिका मिळाल्याने रुग्णास मानसिक त्रास सहन करावा लागला. याबरोबरच आरोग्यसेवेची होणारी हेळसांड पुन्हा एकदा उघड झाली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे, की मंगळवारी (ता. 11) वैरागच्या एका ज्येष्ठ पत्रकाराला दुपारी बाराच्या सुमारास प्रकृती अस्वस्थ वाटत असल्यामुळे तपासणीसाठी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले. त्यांची कोरोनाची रॅपिड टेस्ट ही निगेटिव्ह आली. परंतु त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे, खोकला, सर्दी, ताप, चव न येणे, ऑक्‍सिजन कमी अशी लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी व तपासणीसाठी वैराग येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. 
रुग्णाला पाठवण्याकरिता आरोग्य सेवकाने 108 रुग्णवाहिकेशी संपर्क केला असता, त्याला सांगण्यात आले, की वैरागची 108 रुग्णवाहिका ही इतर कॉलवर आहे. आपणास लवकरच दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल. परंतु, तसे काही झाले नाही. शेवटी तब्बल तीन तासांनी वैराग येथीलच 108 रुग्णवाहिका आली व नंतर रुग्णास बार्शी येथे दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

घडलेल्या प्रकारासंदर्भात वैराग येथील रुग्णवाहिकेच्या चालकास, एवढा वेळ रुग्णवाहिका का मिळाली नाही, अशी विचारणा केली असता त्याने सांगितले, की वैरागचा कॉल आला होता. त्या अगोदरचा कॉल मुंगशी (आर) व भालगाव येथील सात रुग्ण बार्शी येथे घेऊन जात होतो. त्यांना सोडले की मी लगेच या कॉलसाठी आलो व रुग्णाला शिफ्ट केलाय. दुसरी रुग्णवाहिका का मिळाली नाही? हे मात्र त्याला माहीत नव्हते. तुम्हाला जर अधिक माहिती किंवा काही स्पष्टीकरण हवे असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करा, असे सांगितले व पुढे बोलणे टाळले. 

वैराग येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता, रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. परंतु 108 डिव्हिजन हे आमच्याकडे येत नाही. तरी पण मी रुग्णवाहिका उपलब्ध होईपर्यंत रुग्णाची काळजी घेत तेथेच थांबलो व रुग्णाला पाठवून दिले, अशी माहिती त्यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT