Saloon 
सोलापूर

"हे' म्हणतात, कोरोनाचा धोका काही महिने कायम, काम कसे करायचे? 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोनाचा धोका पुढील काही महिने तरी कायम राहणार आहे. तेव्हा काम कसे करायचे, असा प्रश्‍न नाभिक कारागिरांना व मालकांना पडला आहे. कारण, सलूनमध्ये काम करताना सर्व नाभिक कारागिरांचा ग्राहकाशी थेट संपर्क येतो. येणाऱ्या ग्राहकांमध्ये कोण आजारी आहे हे कळत नाही. कुणी शिंकला, खोकलला तरी व्यावसायिकांना, कारागिरांना, येणाऱ्या ग्राहकांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका संभवतो. ग्राहकांमध्ये देखील यासंबंधी काळजीचे वातावरण आहे. याबाबत चर्चा करून नाभिक सलून दुकानदारांनी उपाययोजना केल्या असून, प्रशासनाने घालून दिलेल्या सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे. 

लॉकडाउनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली शहरातील सलून व ब्यूटी पार्लर दुकाने महापालिका आयुक्तांनी घालून दिलेल्या नियम, शर्ती व अटींच्या अधिन राहून शनिवारपासून सुरू करण्याची परवानगी मिळाली. शनिवारी दुकानांची साफसफाई, निर्जंतुकीकरण करण्यात आले. सोमवारपासून ही दुकाने सुरू होणार आहेत. कंटेन्मेंट झोन सोडून बहुतेक सर्व दुकाने साफसफाईसाठी खुली झाली. दुकानदारांनी सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, मास्क, हॅंडग्लोव्ह्‌ज व ग्राहकांसाठी डिस्पोजेबल कटिंग शीटची खरेदी करण्यावर भर दिला. महापालिका आयुक्तांनी परवानगी दिल्याने रविवारी दुकाने उघडणार असल्याचे सलून व्यावसायिकांनी सांगितले. 

सोलापूर ब्यूटी पार्लर असोसिएशनतर्फे सोशल मीडियाद्वारे व्यावसायिकांना सुरक्षा साधने, घ्यावयाची काळजी व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रत्येक पार्लरचा सर्व्हे करून सुरक्षा उपाययोजनांची चोख अंमलबजावणी केलेल्या पार्लरला सर्टिफिकेट प्रदान करण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या अध्यक्षा मानसी हबीब यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

दुकानदार संघाचे व्यावसायिकांना आवाहन 

  • ग्राहक, कारागिरांनी चेहऱ्यावर मास्क लावावा. 
  • डिस्पोजेबल कटिंग शीटचा वापर करा. 
  • कात्री, वस्तरा, फरशा, खुर्च्या वारंवार निर्जंतुक करा. 
  • ग्राहकांची संपूर्ण माहिती, थर्मल स्कॅनिंगमध्ये दर्शविलेल्या तापाची नोंद करा. 
  • पूर्वनोंदणीशिवाय ग्राहकांना प्रवेश देऊ नका. 
  • दुकानात चारपेक्षा अधिक ग्राहक जमणार नाहीत याची दक्षता घ्या. 

सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा 
कोरोनाचा धोका पुढील काही महिने तरी कायम राहणार आहे. तेव्हा काम कसे करायचे, असा प्रश्‍न नाभिक कारागिरांना व मालकांना पडला आहे. सलूनमध्ये कारागिरांचा ग्राहकाशी थेट संपर्क येतो. ग्राहकांमध्ये कोण आजारी आहे हे कळत नाही. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यावसायिकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे 
- अभयकुमार कांती,
विश्‍वस्त-सचिव, श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ 

योग्य सुरक्षा उपाययोजना करणाऱ्यांना मिळणार सर्टिफिकेट 
आमच्या असोसिएशनतर्फे व्यावसायिक व ग्राहकांना सोशल मीडियाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सुरक्षा साधनांच्या उपलब्धतेसाठीही मार्गदर्शन केले आहे. ग्राहकांनी पार्लरला येताना ग्रुपने येऊ नये. सुरक्षेसंबंधित काटेकोर उपाययोजना करणाऱ्या पार्लरला प्रमाणपत्र देऊ, जेणेकरून ग्राहकांनाही सुरक्षेची खात्री पटेल. 
- मानसी हबीब,
अध्यक्षा, सोलापूर ब्यूटी पार्लर असोसिएशन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT