शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे केले आवाहन esakal
सोलापूर

ऑनलाईन पीक पाणी भरण्यासाठी सांगोल्याचे तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर

शेतकऱ्यांनी स्वत:च स्वतःच्या पिकाची नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन पीक पाहणी भरण्याची सुविधा सरकारने उपलब्ध केली आहे.

दत्तात्रय खंडागळे

शेतकऱ्यांनी स्वत:च स्वतःच्या पिकाची नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन पीक पाहणी भरण्याची सुविधा सरकारने उपलब्ध केली आहे.

सांगोला (सोलापूर) : सध्या ऑनलाईन पीक पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत असले तरीही सरकारी यंत्रणा यासाठी कामाला लागल्याचे दिसून येत आहे. सांगोल्याचे तहसीलदार यांनी स्वतः ऑनलाईन पीक पाहणी भरण्यासाठी संगेवाडी येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांना सूचना केल्या. सांगोला तालुक्याचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी तहसीलदार अभिजीत सावर्डे-पाटील यांनी केले.

शेतकऱ्यांनी स्वत:च स्वतःच्या पिकाची नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन पीक पाहणी भरण्याची सुविधा सरकारने उपलब्ध केली आहे. पीक पाणी ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी 14 ऑक्टोबरपर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे. परंतु अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. हे ऑनलाइनचे पिक पाणी भरण्याचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी सांगोल्याचे तहसीलदार अभिजित सावर्डे-पाटील यांनी तालुक्यातील संगेवाडी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन आपण या पिकाची नोंदणी केली आहे का? अशी विचारणा केली. यावेळी नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना लगेच नोंदणी करण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी यांच्यासोबत मंडलाधिकारी बी. एन. कदम, तलाठी एन. व्ही. खरात यांच्यासह गावातील माजी मंडलाधिकारी दामोदर वाघमारे, दीपक शिंदे, पोलीस पाटील जगदीश वाघमारे, अजित पवार उपस्थित होते.

ऑनलाईन पीक पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी, तरुणांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासाठी काम करीत आहेत. ऑनलाईन पीक पाणी भरण्याच्या कामाला आम्ही प्राधान्य दिले असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल.

- अभिजीत सावर्डे-पाटील, तहसीलदार, सांगोला.

गावात तलाठी कार्यालयात कोणत्याही कामासाठी शेतकरी आल्यास त्यांना अगोदर ऑनलाईन पीक पाणी भरले आहे का? अशी विचारणा केली जाते. भरले नसल्याची पिक-पाणी भरुन येण्याच्या सूचना आम्ही करीत आहे.

- एन. व्ही. खरात, तलाठी, संगेवाडी.

अधिकारी व कर्मचारी पिक-पाणी भरण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत. या कामांना नागरिकांनीही सहकार्य करावे. यापुढे पीक पाणी न भरल्यास सातबारा उतारे देण्यास अडचण येणार आहे.

- बी. एन. कदम, मंडलाधिकारी, संगेवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT