Makar Sankranti
Makar Sankranti sakal
सोलापूर

श्री विठ्ठल मंदिर परिसरात महिलांनी वाण देऊन साजरा केला संक्रांतीचा सण

राजकुमार घाडगे

पंढरपूर : मकर संक्रांतीच्या सणानिमित्त शुक्रवारी (ता.14) श्री विठ्ठल मंदिर (Shri Vitthal Mandir) परिसरामध्ये महिला वर्गाने एकमेकांना वाण देऊन संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. याप्रसंगी जमावबंदीचा आदेश असल्याने मंदिर परिसरात महिलांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता. दरवर्षी मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti)निमित्ताने श्री विठ्ठल मंदिर परिसरातील नामदेव पायरी जवळ वाणवसा अर्पण करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने एकत्र येतात.

यंदाही मंदिर परिसरामध्ये एकमेकींना वाण देत महिला वर्गाने संक्रांतीचा सण उत्साहाने साजरा केला. मात्र मंदिर परिसरामध्ये महिलांची गर्दी होऊ नये याची खबरदारी घेताना पोलीस कर्मचारी दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जमाव बंदीचा आदेश असल्याने येथील उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विक्रम कदम हे जातीने मंदिर परिसरात हजर होते. मंदिर परिसरात महिलांची एकत्रित गर्दी होऊ नये यासाठी श्री. कदम यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवले होते. दरम्यान विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने मकर संक्रांतीच्या दिवशी भाविकांना श्री विठ्ठल मंदिरात हार-फुले, प्रसाद घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती.

मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनीकडून लाखेच्या चुड्याला मागणी- मकर संक्रांतीनिमित्त सौभाग्यवती स्त्रियांनी लाखेचा चुडा घालण्याची पद्धत आहे. अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी लाखेचे चुडे घालणे ही एक महाराष्ट्रातील परंपरा आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सुवासिनींनी आपल्या हातात लाखेचा चुडा घालणे शुभ मानले जाते. संक्रांतीला सौभाग्याचं लेणं म्हणून लाखेच्या चुड्याला खूप महत्त्व आहे. या सणानिमित्त मंदिर परिसरातील लाखेच्या चुड्याची विक्री करणाऱ्या महिलांकडून अनेक सुवासिनी लाखेचा चुडा आपल्या हातात परिधान करताना दिसून आल्या. त्यामुळे लाखेच्या चूड्याची मागणी आज वाढली होती. तिळगुळ घ्या गोड गोड बोला- मकर संक्रांति सणाच्या दिवशी ज्येष्ठांनी लहानांना तिळगूळ देत 'तीळ गुळ घ्या गोड गोड बोला' हा संदेश दिला. तर बच्चेकंपनीने संक्रांतीनिमित्त पतंग उडवीत संक्रांतीच्या सणाचा आनंद मनसोक्त लुटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT