सोलापूर

मुलांची भरतेय व्हाॅटसअपवर शाळा

सकाळ वृत्तसेवा

पोथरे ( सोलापूर): लॉकडाऊनमुळे शालेय परिक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांना घरीच बसून अभ्यास करता यावा यासाठी घारगाव वस्ती (ता.करमाळा) येथील शिक्षकांनी पालकांच्या व्हॉटसऍप ग्रुपवर मुलांचा अभ्यास घेत अभ्यासाला चालना दिली आहे. 
हेही वाचा ः सोलापूरात कम्युनीटी हॅास्पीटल अन कीचन सुरु करा
सध्या कोरोना स्थितीमुळे सर्व शाळा बंद आहेत. येथील मुख्याध्यापक निशांत खारगे व सहशिक्षिका कल्याणी रामदासी यांनी घरात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पालकांचा व्हाट्‌सअप ग्रुप काढून त्याद्वारे मुलांना दररोज ग्रुपवर अभ्यास देत आहेत.

 त्यामुळे लॉक डाऊन असले तरी शिक्षकाच्या प्रयत्नामुळे घरातच वर्ग सुरू झाला आहे. 
कोरोनामुळे 23 तारखेपासून लॉक डाऊन सुरू आहे. अशा स्थितीमध्ये सर्व शाळा महाविद्यालय बंद आहेत. फक्त पोलीस, डॉक्‍टर व आरोग्य सेविका, आपत्ती व्यवस्थापन समिती सोडले तर सर्वांचेच काम बंद आहे. घारगाव वस्ती शाळेतील मुख्याध्यापक निशांत खारगे व सहशिक्षिका कल्याणी रामदासी यांनी पालकांचा व्हाट्‌सअप ग्रुप तयार करून दररोज प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावानिशी ग्रुपवर अभ्यास दिला जात आहे. एवढेच नाही तर ग्रुप वरच शंका-कुशंकाचे निरसन केले जात आहे. शाळेने राबविलेला हा उपक्रम इतर शाळेसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे. 

संकलीत मुल्यमापनाचा सराव
यावर्षीचे आकारिक मूल्यमापन झाले पण संकलित मूल्यमापन झाले नाही. शाळा बंद असल्याने ग्रुप द्वारे संकलित मूल्यमापनाचा सराव घेत आहोत.- निशांत खारगे मुख्याध्यापक प्राथमीक शाळा घारगावस्ती पोथरे) 

 गुणवत्तेत सातत्य
कोरोना आपत्तीमुळे शाळा बंद असून परीक्षाही रद्द झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे विस्मरण होऊ नये व गुणवत्ता कमी होऊनये यासाठी ग्रुप द्वारे अभ्यास देत आहोत- कल्याणी रामदासी सहशिक्षक प्राथमीक शाळा घारगावस्ती पोथरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

SCROLL FOR NEXT