0vahan_20japt.jpg
0vahan_20japt.jpg 
सोलापूर

मोठी बातमी ! जप्त वाहनांच्या सुटकेचा ठरला मुहूर्त 

तात्या लांडगे

सोलापूर : लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर देशभर संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर विनाकारण रस्त्यांवरुन फिरणाऱ्या वाहनांसह व्यक्‍तींविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले. 20 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत सोलापूर शहर-जिल्ह्यातील सात हजार 912 वाहने तर राज्यभरात 30 हजारांहून अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. लॉकडाउन संपूर्णपणे उठल्याशिवाय जप्त वाहनांची सुटका केली जाणार नसल्याचे पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी स्पष्ट केले. 

परजिल्ह्यातील तथा परराज्यातून कोणीही येणार नाही, याची खबरदारी म्हणून राज्यभर नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत आठ ठिकाणी नाकाबंदी केली असून सकाळी 8 ते रात्री अकरा वाजेपर्यंत त्याठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचारी नियुक्‍त केले असून होमगार्डही मदतीला घेण्यात आले आहेत. जीवनाश्‍यक वस्तू खरेदीसाठी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वेळ दिली असतानाही पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. औषध आणयला तथा भाजीपाला, किरणा माल आणायला जाताना पोलिस वाहन जप्त करीत असून त्यांच्याकडून मार्चएण्डचे टार्गेट पूर्ण केले जात असल्याचीही चर्चा आता सुरु झाली आहे. मात्र, नागरिकांना वारंवार आवाहन करुनही ते रस्त्यांवरुन फिरत असल्याने कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तर वाहने जप्त झाल्याने अनेकजण घरातच बसून असल्याचा अनुभव आल्याने वाहने टार्गेट केली जात असल्याचीही पोलिसांमध्ये चर्चा होती. दरम्यान, जप्त केलेल्या वाहनांवरील यापूर्वीचा संपूर्ण दंड भरावा लागेल तर संबंधित वाहनाची संपूर्ण कागदपत्रेही दाखवावी लागतील, असेही पोलिस आयुक्‍तांनी स्पष्ट केले. यामध्ये काहीजणांचे वाहन परवानेही रद्द होऊ शकतात, अशी शक्‍यताही आरटीओ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे. 

विनाकारण घराबाहेर पडू नका 
सोलापूर शहरात कोरोनाबाधित एकाचा मृत्यू झाला असून आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करायला हवे. विनाकारण रस्त्यांवर फिरणारी अडीच हजारांहून अधिक वाहने जप्त केली असून वरिष्ठ स्तरावरुन निर्देश आल्याशिवाय या वाहनांची सुटका केली जाणार नाही. 
- अंकूश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर 

सोलापूर शहरातील कारवाई... 

  • 20 मार्चपासून आतापर्यंत एक हजार 642 जणांविरुध्द दाखल झाले गुन्हे 
  • 10 मार्चपासून आतापर्यंत संचारबंदी उल्लंघनप्रकरणी आठ हजार 433 जणांविरुध्द गुन्हे 
  • आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक हजार 27 जणांविरुध्द गुन्हे दाखल 
  • विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या दोन हजार 346, 168 रिक्षा आणि 34 चारचाकी पोलिसांनी केल्या जप्त 
  • लॉकडाउन संपेपर्यंत वाहनांची सुटका करु नये : पोलिस आयुक्‍तांनी दिले स्पष्ट निर्देश 
  •  

पोलिस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले... 

  • लॉकडाउन तथा संचारबंदी लागू झाल्यापासून जिल्ह्यात 664 गुन्हे दाखल 
  • आतापर्यंत जिल्ह्यातील तीन हजार 432 जणांविरुध्द दाखल झाले गुन्हे 
  • आपत्ती व्यवस्थापन अन्‌ संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांचा 24 तास पोलिस ठाण्यात मुक्‍काम 
  • विनाकारण रस्त्यांवरुन फिरणारी जिल्ह्यातील पाच हजार 364 वाहने केली जप्त  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणांचं हत्यार; या तारखेपासून ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा सुरू करणार आंदोलन

Jackie Shroff moves HC : 'भिडू' शब्द वापरायचाय? आधी माझी परवानगी घ्या.. जग्गू दादाची दिल्ली हायकोर्टात धाव

Marathi News Live Update: भावेश भिंडेला फरार घोषित करा; मुंबई होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी किरीट सोमय्यांची मागणी

"तरच सलमानला माफ करू"; सलमानला माफ करण्यासाठी बिश्नोई समाजाने ठेवली 'ही' अट

Breast Cancer: 'या' 5 गोष्टी केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका होऊ शकतो कमी

SCROLL FOR NEXT