Vhankalse
Vhankalse Canva
सोलापूर

"उजनी'चा आदेश रद्द करण्याचे श्रेय शरद पवार व शेतकऱ्यांनाच !

राजकुमार शहा

या प्रश्नी नि:पक्षपातीपणे खासदार शरद पवार हेच न्याय देऊ शकतात, असा विश्वास होता. म्हणूनच त्यांच्या गोविंद बागेत खर्डा भाकर आंदोलन केले.

मोहोळ (सोलापूर) : ज्या दिवशी उजनी धरणातील (Ujani Dam) पाच टीएमसी पाणी इंदापूरला द्यावयाचे असा मुख्यमंत्र्याच्या सहीने आदेश निघाला, त्याच दिवशी जिल्ह्यातील शेतकरी व शेतकरी संघटना पेटून उठल्या. गुरुवारी पाच टीएमसी पाण्याचा निर्णय रद्द झाल्याचे लेखी पत्र मिळाले व आमचा आनंद गगनात मावेना. मात्र पाच टीएमसी पाणी रद्दच्या निर्णयाचे खरे श्रेय खासदार शरद पवार (Sharad Pawar), शेतकरी संघटना (Farmers Associations) व शेतकऱ्यांना जाते, बाकी कोणाचाही संबंध नाही, असे मत स्व. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी संघर्ष समितीचे नागेश व्हनकळसे (Nagesh Vanakalse) यांनी व्यक्त केले. (Sharad Pawar and the farmers are responsible for cancelled the Ujani Dam water distribution order)

श्री. व्हनकळसे पुढे म्हणाले, पाच टीएमसी पाणी इंदापूरला दिले तर शेतकरी देशोधडीला लागणार आहे, त्यामुळे यासाठी आवाज उठविणे गरजेचे होते. राजकीय दबावामुळे महत्त्वाच्या संघर्षासाठी कोणी पुढे येईना. त्यानंतर सर्वानुमते निर्णय घेऊन स्व. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी संघर्ष समितीची स्थापना करून संघर्ष तीव्र केला. आष्टे कोळेगाव बंधाऱ्यावरही आंदोलन केले; मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र एक गोष्ट माहितीची व खात्री होती, की या प्रश्नी नि:पक्षपातीपणे खासदार शरद पवार हेच न्याय देऊ शकतात, असा विश्वास होता. म्हणूनच त्यांच्या गोविंद बागेत खर्डा भाकर आंदोलन जाहीर केले. आंदोलन जाहीर होताच व प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेताच प्रचंड संकटाची मालिका सुरू झाली.

पोलिस मागावर राहिले, मात्र समितीचा आंदोलनाचा निर्धार ठाम होता. त्यामुळे गनिमी काव्याने मी व माझ्या इतर सहकाऱ्यांनी अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर गोविंदबाग गाठलीच व आंदोलन यशस्वी केले असल्याची माहिती नागेश व्हनकळसे यांनी दिली. खासदार शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक श्री. सावंत यांनी मोठा पुढाकार घेऊन संबंधितांशी बोलणे करून दिले व हा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावतो, असे आश्वासन दिले. आंदोलनाला आणखी दोन दिवस पूर्ण होत नाहीत तोवर गुरुवारी पाच टीएमसी पाण्याचा निर्णय रद्द झाल्याचे लेखी पत्र दिल्याने आनंद गगनात मावेना. या आंदोलनाचे सर्व श्रेय खासदार पवार, शेतकरी संघटना व सर्व शेतकऱ्यांना जाते बाकी कोणाचाही संबंध नाही. भविष्यात शेतकऱ्यांसाठी कायम लढत राहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT