Sadabhau Khot esakal
सोलापूर

Sadabhau Khot : चिमणी गेली म्हणून मालकाला काय फरक पडत नाही; असं का म्हणाले सदाभाऊ?

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेतकऱ्यांची दिशाभूल करून खोटी सहानुभूती दाखवून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून येण्याची तयारी करत आहेत.

सोलापूर : चिमणीचे आधीच स्थलांतर न करता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. आपण साखर कारखाना कसा वेळेत सुरु करता येईल यासाठी प्रयत्न करू असे मत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी येथे व्यक्त केले.

येथील सोलापूर विकास मंचाच्या बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सोलापूरची चादर, विडी उद्योग जगभर प्रसिद्ध लाखो कामगार काम करीत आहेत. याही उद्योगाला चालना दिली पाहिजे. माझा पिंड शेतकरी चळवळीतला आहे.

विमानसेवेमुळे शहराचा विकास होत असेल,तरुणांच्या हाताला रोजगार मिळत असेल तर उत्तमच आहे. साखर कारखान्याच्या चेअरमनच्या आडमुठीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तेव्हाच चिमणीचे स्थलांतर झाले असते तर ही वेळ आली नसती.

चिमणी गेली मालकाला काय फरक पडत नाही. उलट शेतकऱ्यांची दिशाभूल करून खोटी सहानुभूती दाखवून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून येण्याची तयारी करत आहेत असा टोला त्यांनी लगावला.

साखर संचालकाकडून माहिती घेऊन कारखाना कशाप्रकारे सुरु करता येईल, याबाबत प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले. तरुणांच्या हातात रोजगार असेल तर जगाची बाजारपेठ काबीज करता येते. सोलापूर विकास मंचच्या या लढ्यासोबत असून शहराच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI डिटेक्शन टूलच्या आधारे विद्यार्थ्यांना दोषी ठरवू नका; सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा इशारा

Crime News: नराधमाचं ४ वर्षीय पोटच्या लेकीसोबत धक्कादायक कृत्य, शिक्षक बापाला अटक; घटनेनं खळबळ

IND vs NZ, 1st Test: भारीच! रिषभ पंतने मारला १०२ मीटरचा गगनचुंबी सिक्स, चेंडू गेला थेट स्टेडियमबाहेर; पाहा Viral Video

Narendra Modi Gold Price Statement : नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्याचे दर ३० हजारांनी घसरले?; काय म्हणाले होते पंतप्रधान

Central Railway: मध्य रेल्वेवर ७ दिवस पॉवर ब्लॉक, मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

SCROLL FOR NEXT