Madha-Shetphal Road
Madha-Shetphal Road 
सोलापूर

माढा-शेटफळ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना व रयत क्रांती संघटना उपसणार आंदोलनाचे हत्यार

अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : माढा-शेटफळ या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कसरत करून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाला रस्ता दुरुस्तीबाबत वारंवार निवेदन देऊनदेखील उपयोग होत नाही. त्यामुळे तातडीने या रस्त्याचे नूतनीकरण करावे; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माढा शहर शिवसेनेच्या वतीने माढा तहसील कार्यालयास निवेदनाद्वारे देण्यात आला. 

दरवर्षीप्रमाणे या वर्षी पावसाळ्यात माढा-शेटफळ रस्त्याची दुरवस्था अधिक भयानक झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती झाली आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात दररोज अपघातांची मालिका सुरू असून, नागरिकांना पाठदुखी, अंगदुखी अशा विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. माढा शहराला जोडणारा हा प्रमुख मार्ग असून देखील गेल्या दोन-तीन वर्षांपासून संबंधित विभाग तात्पुरती दुरुस्ती करत आहे. परंतु निकृष्ट दर्जाच्या पद्धतीने हे काम होत असल्याने रस्ता अधिकच खराब झाला आहे. या रस्त्याचे नूतनीकरण करण्याबाबत वारंवार या भागातून आंदोलनेही करण्यात येत आहेत. तरीदेखील लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. सध्या रस्त्यावर असंख्य मोठे खड्डे आहेत. याबाबत माढा शहर शिवसेनेच्या वतीने शंभू साठे, मुकुंद कदम, चंद्रशेखर कचरे, तुकाराम कचरे, नितीन जाधव यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. 

रयत क्रांती संघटनाही करणार आंदोलन 
रयत क्रांती संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सुहास पाटील म्हणाले, दरवर्षी या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पैसे खर्च केले जातात. परंतु मिलीभगत असणाऱ्या संबंधित ठेकेदाराला दुरुस्तीचे काम दिले जाते. त्यामुळे कामाची तपासणी केली जात नाही. सध्या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत. प्रवाशांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. अनेक वेळा या रस्त्याबाबत निवेदने देऊन देखील रस्ता नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे तातडीने या रस्त्याचे नूतनीकरण न झाल्यास रयत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करू. 

कुर्डुवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सचिन हेडगिरे म्हणाले, माढा- शेटफळ रस्त्याच्या नूतनीकरणाबाबत वारंवार पाठपुरावा सुरू आहे. लवकरच रस्ता मंजूर होईल व रस्ता नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT