Shiv Sena has taken action against Shaila Godse district chief of Shiv Senas womens front.jpg
Shiv Sena has taken action against Shaila Godse district chief of Shiv Senas womens front.jpg 
सोलापूर

महाविकास आघाडीत शैला गोडसे यांची बंडखोरी; शिवसेनेने दाखवला थेट बाहेरचा रस्ता

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवणाऱ्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला धनंजय गोडसे यांच्यावर शिवसेनेने कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी तब्बल 38 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अत्यंत चुरशीने होणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिध्देश्वर आवताडे यांनी अर्ज दाखल करुन त्यांना मोठा धक्का दिला आहे. तर दुसरीकडे पंढरपूर नगरपालिकेतील सत्ताधारी परिचारक यांच्या आघाडीच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भोसले यांची उमेदवारी भगीऱथ भालकेंना शह देण्यासाठी आहे का ? की समाधान आवताडेंना अ़डचणीत आणणारी आहे? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान बंडाचे निशाण फडकवल्याने शैला गोडसे यांच्यावर शिवसेनेने कारवाई केली असून शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाकडून कारवाई झाली तरी आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असे त्यांनी जाहीर केले होते. अपेक्षेप्रमाणे शैला गोडसे यांच्या बंडखोरीची दखल घेऊन शिवसेनेने त्यांची पक्षातून हाकलपट्टी केली आहे. 

महाविकास आघाडीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठींबा असताना देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांनी पक्षाच्या ए बी फाॅर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या प्रचारासाठी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी, रविकांत तूपकर आदी मतदार संघात फिरणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीऱथ भालके यांना गोडसे आणि सचिन शिंदे यांच्यामुळे अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांना कुटुंबातील बंडाळीला सामोरे जावे लागत आहे. समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिध्देश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज भरुन समाधान यांना मोठा धक्का दिला आहे. 

पंढरपूर नगरपालिकेत परिचारक गटाच्या आघाडीची सत्ता आहे. परिचारक यांच्या कट्टर समर्थक असलेल्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले हे पंढरपूर मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्याला नगराध्यक्षा साधना भोसले उपस्थित होत्या. त्याच वेळी नागेश भोसले यांनी मात्र स्वतःचा उमेदवारी अर्ज भरला. नागेश भोसले यांचा पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क असल्याने त्यांची उमेदवारी कोणाला शह देणार आहे. हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे

भगिरथ भारत भालके, समाधान महादेव आवताडे, सचिन अरुण शिंदे, सिध्देश्वर बबन आवताडे, नागेश आण्णासाहेब भोसले, संतोष महादेव माने, संजय नागनाथ माने, संदिप जनार्दन खरात, महेंद्र काशिनाथ जाधव, नागेश प्रकाश पवार, इलियास युसुफ शेख, शैला धनंजय गोडसे, अब्लुलरौफ जाफर मुलाणी, संजय चरणू पाटील, अशोक ज्ञानदेव वाघमोडे, अभिजीत वामनराव आवाडे बिचुकले, अमोल अभिमन्यू माने, सतीश विठ्टल जगताप, पोपट हरी धुमाळ, सुनील सुरेश गोरे, सीताराम मारुती सोनवले, सिध्दाराम सोमण्णा काकणकी, शीतल शिवाजी आसबे, बळीराम जालीदर बनसोडे, किशोर सिताराम जाधव, सुधाकर रामदास बंदपट्टे, मोहन नागनाथ हळणवर, रामचंद्र नागनाथ सलगर, कपीलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडुरंग मसुरे, राजाराम कोॆडीबा भोसले, मनोज गोविंदराव पुजारी, सुदर्शऩ रामचंद्र खंदारे, सिध्देश्वर भारत आवारे, बिराप्पा मधुकर मोटे, बापू दादा मेटकरी, बिरुदेव सुखदेव पापरे, गणेश शिवाजी लोखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT