सोलापूर

सावधान... रोड रोमियोंचा त्रास, मोबाईल अन्‌ पैसे जातायत चोरीला

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्दश्‍वर यात्रेनिमित्त मनोरंजन नगरीचा आनंद घ्यायला व श्री सिध्दश्‍वरांच्या दर्शनासाठी सोलापूर शहर-जिल्ह्यासह परजिल्ह्यातून व परराज्यातून हजारो भाविक येत आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्‍तालयाने स्वतंत्र पोलिस चौकी सुरु केली. मात्र, त्याठिकाणी ठाणे अंमलदार व मदतनीस असे दोनच कर्मचारी आहेत. यात्रेनिमित्त येणाऱ्या महिला व तरुणींना रोड रोमियोंकडून धक्‍काबुकीचा त्रास सहन करावा लागत असून अनेकांचे मोबाइल व पैसे चोरीस गेले आहेत. आतापर्यंत सुमारे 85 जणांचे मोबाइल चोरीस गेले. परंतु, अनेकांनी कुटुंबासमवेत आल्याने तक्रार देणे टाळल्याचे सांगितले. 

गड्डा यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांची सुरक्षितता महत्त्वपूर्ण असल्याने पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्‍त सूचना केल्या आहेत. सुरवातीचे दोन दिवस त्यांच्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत अनेक भाविकांचे मोबाइल, पैसे चोरीस जात आहेत. गर्दीत काही तरुणांकडून जाणिपूर्वक धक्‍काबुकीही केली जात आहे. दरम्यान, सोमवारी (ता. 20) शेळगी परिसरातील यादव कुटुंब गड्डा यात्रेसाठी होम मैदानावर पोहचले. काहीवेळ त्यांनी मनोरंजन नगरीचा आनंद घेतला. गर्दीतून वाट काढताना धक्‍काबुकीच्या प्रकाराला त्यांना सामोरेही जावे लागले. सर्वत्र फिरुन झाल्यावर काहीतरी खायचे म्हणून एका ठिकाणी थांबले. त्यावेळी पर्स पाहिली तर त्यातील मोबाइल आणि पैसे कोणीतरी लंपास केले होते. शेवटी त्यांनी पोलिसांत तक्रार न देता घरी जाणेच पसंत केले, असा अनुभव अनेकांनी कथन केला. 

रोड रोमियोंकडून धक्‍काबुकीचेही प्रकार 
शाळा, महाविद्यालयांबाहेर एरव्ही थांबणारे रोड रोमियो आता गड्डा यात्रेत पहायला मिळत आहेत. शहर-जिल्ह्यातून गड्डा यात्रेनिमित्त होम मैदानावर येणाऱ्या भाविकांना त्यांचा वाईट अनुभव येऊ लागला आहे. गर्दीचा फायदा घेऊन जाणिवपूर्वक धक्‍काबुकी करण्याचे प्रकार त्यांच्याकडून होत आहेत. त्यामुळे बहुतेक महिला, तरुणींनी यात्रेला न जाणेच पसंत केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कुटुंबातील पुरुष आपल्यासोबत असल्याशिवाय अनेक महिला यात्रेला जात नाहीत, असेही सांगितले जाते. 

पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून उलटसुलट उत्तरे 
श्री सिध्देश्‍वर यात्रेनिमित्त होम मैदानावर कुटुंबांसमवेत आल्यावर पैसे, पर्स, पाकिट, मोबाइल चोरीस गेले आहेत. त्याची फिर्याद देण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, त्याठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थीत माहिती देण्याऐवजी उलटसुलट उत्तरे दिली जात असल्याचा अनुभव येऊ लागला आहे. तुमची वस्तू तुम्हाला व्यवस्थीत संभाळता येत नाही का, गर्दीत कशाला फिरायचे अशी उत्तरे दिली जातात, असे काही भाविकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे फिर्याद न दिलेलीच बरी म्हणून काही जणांनी तक्रारच दिली नाही. 

भाविकांच्या अपेक्षा... 

  • होम मैदान व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत 
  • यात्रेत महिला व पुरुषांसाठी असावी स्वतंत्र व्यवस्था 
  • स्वच्छतागृहांची नाही पुरेशी सोय : पार्किंगचीही मुबलक सोय हवी 
  • पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी 
  • साध्या वेशात पोलिस अधिकारी अन्‌ कर्मचाऱ्यांची असावी गस्त 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

एका रिलवर विश्वास ठेवला अन् १५ वर्षांनी आई झाली मराठी अभिनेत्री; व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT