pakshi.jpg 
सोलापूर

पक्ष्यांचे देखणेपण त्या मुलांनी टिपले कॅमेऱ्यात 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः लॉकडाउनच्या सुट्यांमध्ये बाळे गावाच्या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षण व छायाचित्रणाची कला अवगत करत पक्ष्यांची सुंदर छायाचित्रे काढली आहेत. या परिसरातील पक्षी वास्तव्याचा अभ्यास या विद्यार्थ्यांनी केला. 

लॉकडाउनमुळे पहिले काही दिवस रिकाम्या वेळेत नेमके काय करायचे, या विचाराने निसर्गमित्र संतोष धाकपाडे अस्वस्थ होते. त्यांचा घराचा परिसर वृक्षसंपन्न आहे. उंबर, पिंपळ, चिंच, लिंब आणि सप्तपर्णीसारखे विविध वृक्ष घराच्या आजूबाजूला आहेत. एके दिवशी "ची ची ची' करीत एक पक्ष्यांचा समूह पिंपळाच्या झाडावर आला. तो चष्मेवाला नावाने ओळखला जाणाऱ्या पक्ष्यांचा थवा होता. चष्मेवाला पक्षी हा चिमणीपेक्षा थोडा लहान असतो. डोक्‍यापासून पंखापर्यंत शरीर पिवळ्या रंगाचे असते, शेपटी थोडी फिकट तपकिरी रंगाची असते, पोटाखालचा भाग पांढरा असतो, पाय काळ्या रंगाचे असतात. तेव्हा त्यांनी राकेश धाकपाडे, समर्थ धाकपाडे, सूरज धाकपाडे व आदित्य बनसोडे या शाळकरी मुलांना पक्षी निरीक्षण कसे करायचे, हे शिकवले. पक्ष्यांची छायाचित्रे कशी काढायची, याचे मार्गदर्शन केले. अक्षरशः ही मुले छान निरीक्षणाबरोबर उत्कृष्ट छायाचित्रेदेखील काढू लागली. ऑनलाइन अभ्यास आटोपून उरलेल्या वेळेत मुले अशा प्रकारची छायाचित्रे काढत होती. 

चष्मेवाला, चिमणी, सूर्यपक्षी, चिरक, बुलबुल, तांबट, कोकिळा, होला, पारवा, कवडी रामगंगा, शिंपी, सुभग, पोपट, साळुंकी, भांगपाडी मैना, शिक्रा, हळद्या, कावळा, घार या पक्ष्यांची छायाचित्रे काढली. विशेष आकर्षण म्हणजे, काळ्या डोक्‍याचे खाटीक पक्षी देखील या लॉकडाउनमुळे घराच्या आजूबाजूच्या परिसरात दिसून आले. एवढे विविध प्रकारचे पक्षी आपल्या परिसरात आढळतात, हे या लॉकडाउनमुळे कळले. या विद्यार्थ्यांनी आता पक्षी छायाचित्रणाचे कौशल्य शिकून घेतले. या विद्यार्थ्यांचा स्वतःचा एक छायाचित्र संग्रह तयार झाला आहे. 

छायाचित्रणात संयम महत्वाचा 
पक्षी निरीक्षण व छायाचित्रणासाठी आधी खूप संयमाने पक्ष्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे लागते. पक्षी सामान्यपणे हालचाल करू लागले की त्यांना चाहूल न लागता कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे घेता येतात. 
- राकेश धाकपाडे, विद्यार्थी छायाचित्रकार
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT