gandhi jayanti.jpg 
सोलापूर

कॉंग्रेसच्या वतीने कृषी विधेयक मागे घेण्यासाठी स्वाक्षरी मोहिम व धरणे 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः शहर कॉंग्रेस कमिटी च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतिनिमित्त, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रेल्वे स्टेशन येथील पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घ्यावे या मागणी साठी स्वाक्षरी मोहीमेचे शुभारंभ ही करण्यात आला. 

तसेच कॉंग्रेस भवन सोलापूर येथे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी सोलापूर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, विश्वनाथ चाकोते, नगरसेवक बाबा मिस्त्री, विनोद भोसले, अंबादास बाबा करगुळे, गणेश डोंगरे, गौरव खरात, माजी महापौर नलिनिताई चंदेले, अलकाताई राठोड, आरिफ शेख, युवराज राठोड, केशव इंगळे, भीमाशंकर ठेकाळे, तिरुपती परकीपंडला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

तसे कॉंग्रेस भवनात सोलापूर शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घ्यावे या मागणीसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी कॉंग्रेस भवन सोलापूर येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषि विधेयक मागे घ्यावे अशी मागणी केली. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करुन मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी सोलापूर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W Hockey: ४४ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! चीनला फायनलमध्ये हरवत भारताचा गोल्डवर कब्जा; थेट ऑलिम्पिकचं तिकीटही मिळवलं

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

SCROLL FOR NEXT