Soalpur Crime  Sakal
सोलापूर

Soalpur: पैशासाठी आईचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप; घरी कोणी नसल्याचा फायदा घेत...

सत्र न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

बार्शी - मुलगा आईकडे वारंवार पैशाची मागणी करीत असे. त्यातून अनेकवेळा तक्रारी झाल्या. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, पण घरी कोणी नसल्याचा फायदा घेत दगड डोक्यात घालून आईचा खून केला व मृतदेह प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुलास बार्शी जिल्हा सत्र न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

श्रीराम नागनाथ फावडे (रा. वाणी प्लॉट) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. रुक्मिणी नागनाथ फावडे असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, पोलिस हवालदार अरुण माळी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ही घटना १२ ऑक्टोबर २०२१ रोजी घडली.

आईने खर्चासाठी पैसे दिले नाहीत, याचा राग मनात ठेवून मुगला श्रीरामने रात्रीच्या वेळी रुक्मिणी फावडे यांच्या डोक्यात दगड घालून खून केला.

गादीवर रक्त तसेच डोक्यात घातलेला दगड, डोक्यात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आदी साक्षी- पुरावे न्यायालयासमोर ठेवण्यात आले होते. तत्कालीन पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

अभियोग पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचा पुरावा व सरकार पक्षातर्फे राजश्री कदम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी श्रीराम फावडे यास जन्मठेप व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हवालदार बाळासाहेब चौधरी यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रेल्वे गाड्यांना उशीर, परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक; रेल्वेची तोडफोड, IGसह पोलीस जखमी

IND vs AFG: थांबा आईचा कॉल येतोय... नितीश रेड्डीचा पत्रकार परिषद सुरू असतानाच वाजला फोन अन् मग...; पाहा Video

Gurupushyamrit Yoga Significance : गुरुपुष्यामृत योगातून त्रिवेणी संगमाच्या आध्यात्मिक अर्थाचा उलगडा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 जून 2026

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ जून २०२६ ते २० जून २०२६)

SCROLL FOR NEXT