Social Media
Social Media Google
सोलापूर

सोशल मीडिया ठरतोय घबराटीचे मूळ कारण ! निधन वार्ता, चुकीच्या माहितीचा भडिमार

अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : कोरोना या जागतिक महामारी संकटाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण राज्यात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असून, गेल्या वर्षीपेक्षा यंदा मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे. याला स्वतः नागरिकही जबाबदार असून, विना मास्क, नो सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर न वापरणे, आरोग्याची खबरदारी न घेणे ही मूळ कारणे असली तरी, यंदा मात्र सोशल मीडियावरील कोरोनाच्या बाबतीत फिरणारे उलट-सुलट मेसेज, टीव्हीवरील बातम्या व दररोज स्टेटसच्या माध्यमातून फिरणारे भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेज नागरिकांना मानसिकदृष्ट्या कुमकुवत करत आहेत. एकमेकांना धीर देण्याच्या या काळात सोशल मीडियावरील निधन वार्ताच्या पावसामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरत आहे.

सध्या कोरोनामुळे वयोवृद्ध तसेच विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांची स्थिती नाजूक आहे. सध्याच्या परिस्थितीला एकमेकांना मानसिक तसेच आर्थिकदृष्ट्या सहकार्य करण्याची वेळ आहे. परंतु याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या न्यूज चॅनेल सुरू करताच कोरोनामुळे या जिल्ह्यात इतके मृत्यू, एवढे रुग्ण आढळले, रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा तुटवडा, ऑक्‍सिजनची कमतरता, रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत, स्मशानभूमीतील मृत्यूंचे व्हिडिओ तसेच दिवसभरातील मृत्यूच्या आकडेवारीचा चॅनेलच्या माध्यमातून मारा केलेला दिसून येतो. या सर्व घटना सत्य जरी असल्या तरी, त्या बघणाऱ्या नागरिकांच्या मनावर विपरीत परिणाम करत असल्याचे दिसत आहे. त्यात अजून सोशल मीडियावरील मेसेजची भर पडत आहे.

व्हॉट्‌सऍपच्या ग्रुप्सवर दिवसभर "धक्कादायक, कोरोनाचा कहर, कोरोनाचा उद्रेक, बापरे' या मथळ्याखाली येणाऱ्या बातम्या तसेच कोरोनाने झालेले मृत्यू व नवीन आकडेवारी धुमाकूळ घालत आहेत. त्याचबरोबर दवाखान्यातील "मन हेलावून टाकणारे' मृत्यूचे व्हिडिओज, त्याला भावनिक गाणे जोडत दिवसभर एकमेकांना फॉरवर्ड करत स्टेटसला ठेवून कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत भावनिक असल्याचे दाखवले जात आहे. परंतु अशा व्हिडिओंमुळे तरुणांवर, वयोवृद्ध पुरुष, महिला तसेच लहान मुलांवर नकळत, कोरोनाशी लढा देताना मानसिक प्रचंड गोंधळ निर्माण करणारे मेसजमुळे नकारात्मकता येत आहे. कोरोना झाले की, मृत्यूच होतो अशी मानसिक भावना निर्माण होत आहे. याला कोणीतरी बंदी घातली पाहिजे. परंतु कोणी व कशी बंदी घालायची असाही प्रश्न आहे.

नागरिकांनी सोशल मीडियावर कोरोनाच्या बाबतीत अस्वस्थ करणारे मेसेजेस, व्हिडिओ फॉरवर्ड करू नयेत. उलट नागरिकांना सकारात्मक व दिलासा वाटेल असे मेसेज फॉरवर्ड करावेत. नकारात्मक मेसेजमुळे संवेदनशील, इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांवर नकारात्मक परिणाम होऊन भीतिदायक वातावरण निर्माण होते. त्यातून रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, आत्महत्या करणे, नैराश्‍य, चिंता येते. प्रत्येक मृत व्यक्ती ही कोरोनाने मृत्यू झाली हे असे चुकीचे असून इतर आजार देखील असतात.

- डॉ. महेश देवकते, मानसोपचार तज्ज्ञ, बार्शी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT