solapur
solapur sakal
सोलापूर

Solapur : पावसाळ्यातच १४ गावे अन्‌ १२७ वाड्यांना टंचाईच्या झळा; जिल्ह्यातील पाण्याची स्थिती चिंताजनक; उजनी ६० टक्क्यांवर

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला, तरीदेखील राज्यातील धरणांतील पाणीसाठा ६० टक्क्यांवरही गेलेला नाही. दुसरीकडे, पावसाळा अजून संपलेला नसतानाही राज्यातील ३१४ गावांसह ९९२ वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील १४ गावे व १२७ वाड्यांवर टॅंकरने पाणी पुरविले जात आहे.

पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, विसापूर, चिल्हेवाडी, कासारसाई, मुळशी, टेमघर, खडकवासला, गुंजवणी, वीर व उजनी ही धरणे अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्याचा आधार असलेले उजनी धरण अद्याप ६० टक्क्यांवरच आहे. यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामात पाणी सोडता आलेले नाही. १५ ऑक्टोबर २०२३ ते १५ जून २०२४ या आठ महिन्यांचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

शेतीला एक-दोन आवर्तने सोडली जातील, पण पहिले प्राधान्य पिण्यासाठीच असणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंतचा पाणीसाठा अंतिम मानून कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून धरणातील उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केले जाणार आहे. शेतीला साधारणत: डिसेंबर-जानेवारीत एक आवर्तन सोडले जाते, पण यंदा हे पाणी फेब्रुवारीअखेरीस सोडले जाऊ शकते.

जिल्हानिहाय टॅंकर

जिल्हा गावे वाड्या टॅंकर

नाशिक ९८ १४१ ८७

जळगाव ११ ०० ११

पुणे १० ६१ ११

सातारा ७९ ३५७ ८६

सांगली ३० २९१ ३५

सोलापूर १४ १२७ ०६

छ. संभाजीनगर ५५ ०२ ५९

जालना १६ १३ २८

एकूण ३१४ ९९२ ३२४

उजनी पाणीपातळी

दुसरीकडे, मार्च-एप्रिलमधील आवर्तन मे महिन्यात सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा अजून संपलेला नसतानाही शेतकऱ्यांचीही चिंता वाढल्याची सद्य:स्थिती आहे. जिल्हानिहाय टॅंकर जिल्हा गावे वाड्या टॅंकर नाशिक ९८ १४१ ८७ जळगाव ११ ०० ११ पुणे १० ६१ ११ सातारा ७९ ३५७ ८६ सांगली ३० २९१ ३५ सोलापूर १४ १२७ ०६ छ. संभाजीनगर ५५ ०२ ५९ जालना १६ १३ २८ एकूण ३१४ ९९२ ३२४ उजनी पाणीपातळी पाणीपातळी ः ४९४.८६५ मीटर एकूण पाणीसाठा ः २७१३.१८ दलघमी (९५.८० टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा ः ९१०.३७ दलघमी (३२.१५ टीएमसी) टक्केवारी ः ६०.०० (सोमवारी रात्री दहाची स्थिती)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT