farmer news solapur esakal
सोलापूर

Solapur : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी चार हजार कोटी वितरित होणार

तीन टप्प्यांत प्रोत्साहन अनुदान

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : राज्यातील २३.१४ लाख शेतकरी नियमित कर्जदार आहेत. त्यांना तीन टप्प्यांत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहेत. ८ लाख २९ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ४२ हजार ६४७ शेतकरी आहेत. त्यांना जवळपास २०० कोटी रुपये मिळणार आहेत.

दोन दिवसांत आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर या शेतकऱ्यांना १८ ऑक्टोबरला अनुदान रक्कम वितरित केली जाईल. १८ जिल्ह्यांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणूक सुरू असल्याने तेथील जवळपास १४ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये अनुदान मिळणार आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, अवकाळी अशा नैसर्गिक संकटात नियमित कर्जदार शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांना अद्याप अनुदान मिळाले नव्हते.

शिंदे-फडणवीस सरकारने आता २०१७ ते १८, १८ ते १९ आणि १९ ते २०२० या तीन वर्षांतील कोणत्याही दोन वर्षांत कर्जाची परतफेड केलेल्यांना हा लाभ दिला जाईल. ही रक्कम बॅंकांनी कर्जापोटी वर्ग करून घेऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात ही रक्कम वितरित केली जाणार आहे. शेतकऱ्यांना जवळपास १२ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. अडचणीतील जिल्हा बॅंकांचीही थकबाकी कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, सोलापूर या जिल्हा बॅंकांना सर्वाधिक रक्कम मिळणार आहे.

अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वीच...

यंदा बहुतेक जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास २१ जिल्ह्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मदत म्हणून शेतकऱ्यांसाठी सरकारने चार हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक व सततचा पण ६५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला. शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांनाही भरपाई दिली जात आहे. दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार आहे.

प्रोत्साहनपर अनुदान

पहिला टप्पा

८.२९ लाख शेतकरी - ४,००० कोटी रुपये

दुसरा टप्पा

१० लाख शेतकरी - ५,००० कोटी रुपये

तिसरा टप्पा

४.८५ लाख शेतकरी - १,२०० कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT