भिमा सहकारी साखर  sakal
सोलापूर

Solapur : भीमा कारखान्याचे सहा लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ;अध्यक्ष, विश्वराज महाडिक

टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023/24 च्या 44 व्या गळीत हंगामा साठीचे मीलरोलर पूजन सोहळा

राजकुमार शहा

मोहोळ : टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023/24 च्या 44 व्या गळीत हंगामा साठीचे मीलरोलर पूजन सोहळा भीमा परिवाराचे मार्गदर्शक तथा राज्यसभा खा. धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत, कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांच्या हस्ते बुधवार ता 28 जून रोजी सकाळी 11 वाजता कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.

आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात चांगले पाऊसमान अपेक्षित असल्याने ऊस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल असा अंदाज आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने 6 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी लागणारी ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा, मशिनरी ओव्हर ऑईलिंग सह दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अनेक अडथळ्यांवर मात करत कारखान्याची वाटचाल सुरु आहे.

येणारा गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल,असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला. कारखान्यातील हंगाम पूर्व कामे वेळेत पूर्ण करून कारखान्याचा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपापल्या विभागाची कामे पूर्ण करावीत असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी खा महाडिक यांच्या मातोश्री मंगल महाडिक, भीमा परिवाराचे नेते तथा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, अरुंधती महाडीक, पृथ्वीराज महाडिक, विराज महाडिक, कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक एस.जे.शिंदे, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT