light 1.jpg
light 1.jpg 
सोलापूर

दिव्याने झळाळले सोलापूर शहर 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर ः कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी देशात एकजूट असल्याचे चित्र आज दिव्यांच्या माध्यमातून बघायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री नऊ वाजल्यापासून नऊ मिनिटांपर्यंत घरातील लाइट बंद ठेवून दिवे लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सोलापुरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सोलापूर शहरातील विविध नगरांमध्ये, गल्लीबोळांमध्ये, अपार्टमेंटमध्ये नागरिकांनी दिवे लावले होते. सोलापूर शहर व परिसर या दिव्यांमुळे झळाळून गेला होता. 

होटगी रोड : येथील परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक चाळींमध्ये घरातील लाइट बंद करून दिवे लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. होटगी रोडवर बालाजी सरोवरसारखे पंचतारांकित हॉटेल आहे. मात्र, त्या ठिकाणीही हॉटेलमधील सर्व लाइट बंद करून दारावर दिवे लावल्याचे पाहायला मिळाले. आसरा चौकात असलेल्या मेडिकल दुकानावरही दिवे लावल्याचे दिसून आले. त्याचबरोबर आसरा चौकातून सिद्धेश्‍वर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रहिवाशांनी आपल्या घरातील लाइट बंद करून बाल्कनीमध्ये, घराच्या दरवाजामध्ये, खिडकीमध्ये दिवे लावले असल्याचे पाहायला मिळाले. रस्त्याच्या मधोमध असलेल्या लाइट सुरू होत्या. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांमधील लाइट बंद झाल्या होत्या. त्या ठिकाणी लाइटऐवजी दिवे लावल्याचे पाहायला मिळाले. गणेश बिल्डर्स सोसायटीमध्ये जवळपास 200 कुटुंबे राहतात. त्या सर्वच कुटुंबीयांनी आपल्या घरातील लाइट बंद करून दिवे लावले होते. त्या ठिकाणी राहणाऱ्या तरुणांनी आपल्या मोबाईलमधील बॅटरी चालू करून मोदींनी दिलेल्या आवाहनाला उदंड प्रतिसाद दिला. या सोसायटीमधील नागरिक नऊ वाजण्याची वाट पाहात होते. त्यापूर्वी सगळ्यांनी दिव्यांची जय्यत तयारी केली होती. घड्याळाचा काटा नऊवर गेल्यानंतर पटापट आपल्या घरातील लाइट बंद करून खडकीमध्ये, दरवाजामध्ये, बाल्कनीमध्ये त्यांनी दिवे लावल्याचे दृष्टीस पडले. त्याचबरोबर सिल्व्हर स्प्रिंग या इमारतीमध्येही हीच स्थिती आढळून आली. एकूणच होटगी रोड परिसरात मोदींनी केलेल्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. 

विजापूर वेस : विजापूर वेस परिसरात म्हणावा तसा प्रतिसाद दिसला नाही. मात्र, अन्य ठिकाणी लावलेले दिवे पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. घरासमोर दिवे लावून नागरिकांनी कोरोनाचा यशस्वी मुकाबला करण्याचा संकल्प केला. काहींनी लॉकडाउनमुळे घरात खाद्यतेल नसल्याने दिव्याऐवजी मोबाईल टॉर्च लावले होते. अपेक्षेप्रमाणे विजापूर वेसमध्ये मोदींच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यशोधरा हॉस्पिटल, आजोबा गणपती परिसर, दत्त चौक, जिल्हा परिषद या परिसरात घराबाहेर पडलेले नागरिक दिसले, मात्र दिवे दिसलेच नाहीत. बहुतांश नागरिकांच्या हाती मोबाईल टॉर्च पाहायला मिळाले. लष्कर व दत्त चौक परिसरातील नागरिकांनी गो कोरोना, गो कोरोना अशा घोषणाही दिल्या. या वेळी चिमुकल्यासंह तरुण मुला-मुलींनी आनंद लुटला. दरम्यान, दिवे लावण्यामुळे परिसरात झालेल्या गर्दीकडे पोलिसांनी काणाडोळा केल्याचेही दिसून आले. काहीवेळांनी मात्र, त्यांनी नागरिकांना घरात जाण्याचे आवाहनही केले. 

विडी घरकुल : जुने विडी घरकुल परिसरात रविवारी रात्री 8.30 पासूनच नागरिकांनी दिवे, मेणबत्तीसह तयारी केली होती. रात्री बरोबर नऊ वाजता सोनियानगर परिसरातील सोना-चांदी, हिरा-मोती टॉवर, सिद्धी भवन व प्लॅटिनम कॉम्प्लेक्‍स आदी पाच-सहा मजली अपार्टमेंटमधील सर्व फ्लॅटमधील विद्युत दिवे बंद झाली व सुरू झाला दिव्यांचा झगमगाट. सोबत "भारत माता की जय', "जय भवानी, जय शिवाजी', "वंदे मातरम्‌', "गो कोरोना गो' अशा घोषणा देण्यात आल्या. विडी घरकुलमधील कामगार वसाहतीत घरोघरी दिव्यांचा व मोबाईल टॉर्चचा झगमगाट करण्यात आला. सोबत भुईनळे व फटाके फोडण्यात आले. गोंधळी वस्तीमधील सर्वच घरांसमोर दिवे लावण्यात आले होते. तेथील एस. एस. आयकॉन अपार्टमेंटच्या प्रत्येक बाल्कनीत दिव्यांचा प्रकाश पसरला होता. याचबरोबर वसुंधरा सोसायटी, राजेश कोठे नगर, महेशनगर आदी परिसरातील नागरिकांनीही दिवे लावून पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. पूर्वभागातील अशोक चौक, कर्णिकनगर, एकतानगर, दत्तनगर, भद्रावती पेठ, माधवनगर, नीलमनगर, सुनीलनगर, सर्व कामगार वसाहत व झोपडपट्टीमध्येही प्रत्येक घरासमोर दिवे लावण्यात आले होते. 

मंत्री चंडकनगर : मंत्री चंडकनगर येथील अनेक घरांमध्ये दिवे बंद करून "वंदे मातरम', "भारत माता की जय', "जय भवानी जय शिवाजी' अशी जयघोषणा देण्यात आल्या. कोरोनारुपी राक्षसाला प्रकाशाची ताकद दाखवून संकटाचा अंधार दूर करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्री चंडकनगर येथील रहिवाशांनी संपूर्ण दिवे बंद करून दिवे, मेणबत्ती आणि मोबाईल टॉर्च लावून अनेक जयघोषाने सारा परिसर दुमदुमला होता. एकजुटीने कोरोनाचा सामना करण्यासाठी नागरिक एकत्र येऊन दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावून त्यांची ताकद दाखवून दिली. तसेच शहरातील काही भागांमध्ये रस्त्यावरही पेपर एकत्रित करून लहानशी होळी पेटविण्यात आली. तसेच काही ठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजीही करण्यात आली. 

जुळे सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जुळे सोलापूरकरांनी घरातील दिवे बंद करून परिसर प्रकाशमान केला. दावत चौक परिसरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्‍समध्ये "भारत माता की जय..'च्या घोषणा देण्यात आल्या. येथील सर्व रहिवाशांनी आपल्या दारात, बाल्कनीमध्ये दिवे लावले. लाइट बंद करून सर्वांनी पणत्या लावल्याने खूपच सुंदर दृश्‍य दिसत होते. काही उत्साही नागरिकांनी फटाक्‍यांची आतषबाजी केल्याचे दिसून आले. याबाबत पर्यावरणप्रेमी नागरिकांनी नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

दमाणीनगर : इंद्रधनू अपार्टमेंटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बरोबर रात्री नऊ वाजता अपार्टमेंटमधील सर्वांनी आपापल्या घरातील तसेच आपर्टमेंटमधील विजेचे दिवे बंद करून "वंदे मातरम', "भारत माता की जय', "जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा दिल्या. रहिवाशांनी संपूर्ण बंद करून दिवे, मेणबत्ती आणि मोबाईल टॉर्च लावून अनेक जयघोषाने सारा परिसर दुमदुमला होता. एकजुटीने कोरोनाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावून त्यांची ताकद दाखवून दिली. 

एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढण्यास समर्थ 
मोदींनी केलेले आवाहन शास्त्राला धरून होते. आपण सगळे एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढण्यास समर्थ होऊ यासाठी पंतप्रधानांनी हे आवाहन केले होते. यातून त्यांनी एकीचा संदेश दिला आहे. 
- राघवेंद्र कुलकर्णी, रहिवासी 

सीमेवर जाऊनच नाहीतर घरात बसून करा देशसेवा 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षेसाठी जे काय आवाहन केले आहे, त्यासाठी शहरवासीयांनी साथ दिली, याचा अभिमान वाटत आहे. प्रत्येकाने सीमेवर जाऊन लढले पाहिजे असे नाही तर आपण घरात बसूनही देशसेवा करू शकतो. 
- वर्षा भावार्थी, मंत्री चंडकनगर 

हेही वाचा : ...म्हणूनच जवळ आलेली लग्नाची तारीख पुन्हा ढकलली पुढे 
 
एकी दिसून आली संकट दूर होणार 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जुळे सोलापूरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. या माध्यमातून आपल्या सर्वांची एकी दिसून आली. आपले संकट दूर होईल हा विश्‍वास आहे. 
- महेश पात्रुडकर, जुळे सोलापूर 
 
कोरोना घालविण्यासाठी दिवे लावून परिसर केला प्रकाशमान 
संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले आहे. आम्ही सर्वांनी नऊ वाजता दिवे लावून परिसर प्रकाशमान केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. 
- शैलेजा काळे, जुळे सोलापूर 

सोशल डिस्टन्स पाळायला हवे 
को
रोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सर्वांनी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. सोशल डिस्टन्स पाळायला हवे. सर्वांनी आज दिवे लावून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. 
- श्रावण बिराजदार, जुळे सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT