योग, संगीताकडे दुर्लक्ष
योग, संगीताकडे दुर्लक्ष sakal
सोलापूर

सोलापूर : कोरोनात योग, संगीताकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाचे निर्बंध शिथिल होत असताना शाळा, हॉटेल, मॉल्स, थिएटर याबाबत स्पष्टपणे आदेश निघतात मात्र, योग व संगीताच्या स्पर्धा आणि क्‍लासबद्दल कोणतेही स्पष्ट आदेश नसल्याने क्‍लासचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शासनाने आदेश देताना या क्षेत्राचाही स्पष्ट उल्लेख करावा, अशी मागणी योग आणि संगीत क्‍लासचालकांमधून होत आहे.

कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये पहिल्या व दुसऱ्या लाटेत सर्व बंद होताच योग व संगीत क्‍लासही बंद झाले. टप्प्याटप्प्याने अनलॉक होत असताना कधीच योग व संगीत क्‍लासबाबत स्पष्ट आदेश दिले गेले नाहीत. सध्या योगाच्या जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने पार पडल्या आहेत. राष्ट्रीय स्पर्धा तरी ऑफलाइन होतील, अशी अपेक्षा योगस्पर्धक करत आहेत.

मानवी मनाला स्थिर करण्याचे काम संगीत व योग करतात. मन आणि शरीर दोन्ही तंदुरस्त ठेवण्यासाठी योग आणि संगीताची आवश्‍यकता आहे. कोरोनाच्या काळातही योग नियमित करणे आवश्‍यक आहे. योग असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन भुतडा यांनी काही दिवसापूर्वी झालेल्या हॉटेल सीटी पार्क येथे झालेल्या योग असोसिएशनच्या बैठकीत कोरोनाकाळात योगावर निर्बंध नसावेत, कारण योग हा कोरोनाला प्रतिबंध करणारा आहे, असे मत मांडले होते. या बैठकीला राज्याचे क्रीडा संचालकही उपस्थित होते. मात्र, तरीही दोन्ही लॉकडाउनमध्ये योग स्पर्धेवर निर्बंध होतेच. सध्या कोणतेही स्पष्ट आदेश नसल्याने योग व संगीत क्‍लासचालकांत संभ्रम अवस्था आहे.

मे महिन्यातील परीक्षा ऑक्‍टोबरमध्ये

अखिल भारतीय गंधर्व महामंडळाने कोरोनाकाळात परीक्षा पुढे ढकल्या होत्या. शालेय परीक्षा झाल्यानंतर एक महिन्याने संगीत परीक्षा घेण्याचा आजवरचा दंडक आहे. मात्र, यंदा मे महिन्यात होणाऱ्या संगीत परीक्षा १० ऑक्‍टोबर रोजी झाल्या आहेत. त्यातही लेखी परीक्षेचे पेपर घरीच लिहून जमा करावेत असे सांगण्यात आले. मुळात संगीत परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. प्रात्यक्षिक घेताना परीक्षकासमोर एक किंवा दोनच विद्यार्थी असतात. मुळातच अंतर ठेवून होणाऱ्या या परीक्षेशी कोरोनाच्या निर्बंधाचा काहीच संबध नसतानाही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. शेवटी पुढे ढकलेल्या परीक्षाही प्रश्‍नपत्रिका घरी पाठवण्यात आल्या व घरीच उत्तरपत्रिका लिहून परीक्षा केंद्रावर जमा करण्यास सांगितले, हे काम मे महिन्यातही झाले असते.

कोविड काळातही योगस्पर्धेला परवानगी दिली असती तर कदाचित त्याचा फायदाच झाला असता. क्‍लाससह, योगस्पर्धा, परीक्षा व जाहीर कार्यक्रमांना त्वरित परवानगी मिळावी. अनलॉकच्या आदेशात योगाचा स्पष्ट उल्लेख असावा.

- मनमोहन भुतडा, अध्यक्ष, योग असोसिएशन, सोलापूर

कोरोना काळात क्‍लासचे प्रमाण कमी झाले. निव्वळ बंदऐवजी ऑनलाइन काही प्रमाणात योगवर्ग सुरू होते. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ध्यान, योग शिबिरांची आवश्‍यकता आहे. यासाठी योग शिबिरांना परवानगी देणे आवश्‍यक आहे.

- विजयकुमार गुजले, खजिनदार, योग असोसिएशन, सोलापूर

कला क्रीडा व संगीत हे मानवी आयुष्यातील अविभाज्य घटक आहेत. माणसाचे मन, मनगट व मेंदू सुदृढ करणारी ही क्षेत्रे आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करत आहे. खरे तर संगीत व योग हे विषय अभ्यासक्रमातदेखील सक्तीचे करावेत.

-अनिल सर्जे, तालसाधक

ज्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह संगीत क्‍लासवर चालतो. त्यांना या दिवसात खूपच अडचणी आल्या. मुळात संगीताकडे लोकांचा ओढा कमी आहे. संगीत हा प्रॅक्‍टिकल शिकण्याचा विषय आहे. यामुळे ऑनलाइन क्‍लासला विद्यार्थी संख्या कमी होते. संगीतावरील सर्व निर्बंध उठवावेत.

- सदशिव चवरे, संगीत शिक्षक

आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. दिवाळीनंतर पाचवीपासूनही होतील. मग संगीत क्‍लासवच निर्बंध का? मुळात क्‍लासला गर्दी नसते. संगीत क्‍लासला परवानगी द्यावी.

- देवेंद्र आयाचित, संगीत विशारद

मुळात कोरोनामुळे विद्यार्थी संख्या घटली आहे. संगीत हे मानवी मनाला उभारी देणारे आहे. कोरोनाच्या नकारात्मक काळात संगीत सकारात्मक उर्जा निर्माण करू शकते. सर्व संगीत वर्ग व सुगम संगिताच्या कार्यक्रमांना त्वरित परवानगी मिळणे आवश्‍यक आहे.

- नागेश पवार, स्वरनाद संगीत विद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT