Corona Vaccination esakal
सोलापूर

लसीच्या कोट्यावरून शहर-ग्रामीणचा वाद ! शहरासाठी 40 टक्‍के लस नकोच

तात्या लांडगे

जिल्ह्यासाठी एकावेळी किमान 50 हजार डोस मिळावेत, अशी सातत्याने मागणी केली जात आहे.

सोलापूर : शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. दररोज सरासरी दोन हजारांहून अधिक रुग्ण (Patient) सापडत असून मृत्यूची संख्याही चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागात लसीकरणाचा (vaccination) वेग वाढणे अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी मिळणाऱ्या एकूण लसीतील 40 टक्‍के लस (vaccination) शहरासाठी देऊ नये, अशी मागणी जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील (dr archana patil) यांच्याकडे केली आहे. (solapur covid19 preventive vaccination dr archana patil)

सोलापूर जिल्ह्यासाठी आतापर्यंत लसीचे चार लाख 78 हजार 185 डोस मिळाले आहेत. त्यात एक लाख 54 हजार 306 डोस शहरासाठी देण्यात आले आहेत. तर उर्वरित लस ग्रामीण भागासाठी वापरण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी एकावेळी किमान 50 हजार डोस मिळावेत, अशी सातत्याने मागणी केली जात आहे. मात्र, 20 हजारांवर लस मिळत नसल्याच्या तक्रारही डॉ. पाटील यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान, शहरातील रूग्णसंख्या आटोक्‍यात येत असल्याने एकूण मिळणाऱ्या लसीतील 25 ते 30 टक्‍के लस शहरासाठी देण्यास परवानगी मिळावी, अशीही मागणी त्यांच्याकडे यावेळी काही अधिकाऱ्यांनी केली.

विभागीय आयुक्‍तांच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिळणाऱ्या एकूण लसीपैकी 70 टक्‍के लस दुसऱ्या डोससाठी तर केवळ 30 टक्‍के लस पहिल्या डोससाठी वापरली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागासाठी लस कमी पडत असल्याने शहराचा कोटा कमी करण्याची मागणी बैठकीत झाली. मात्र, त्यावर आरोग्य संचालिकांनी तोंडावर बोट ठेवल्याने आता हा निर्णय जिल्हाधिकारी घेतली, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

'ग्रामीण'मध्येही लसीकरणापूर्वी नोंदणी बंधनकारक

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असून मृत्यूदरही चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर 339 केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करूनही पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्याने सध्या केवळ 40 ते 43 केंद्रांवरच लसीकरण सुरू आहे. अपुऱ्या केंद्रांमुळे अनेकजण त्याठिकाणी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर आता विभागीय आयुक्‍तांनी नवे निकष तयार केले असून लसीकरण केंद्राच्या 100 मीटर परिसरात ऑनलाईन नोंदणी केलेल्या व्यक्‍तीलाच प्रवेश दिला जाणार आहे. तर ग्रामीण भागातील प्रत्येकांनी लस घेण्यापूर्वी स्वत:हून नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पाठविण्यात आल्याची माहिती लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी दिली.

आरोग्य संचालिका डॉ. पाटील यांचा सोलापूर दौरा

शहरातील रुग्णसंख्या कमी होत असतानाच ग्रामीण भागाची चिंता वाढली आहे. पंढरपूर, करमाळा, दक्षिण सोलापूर, मोहोळ या तालुक्‍यातील मृत्यूदर सर्वाधिक आहे. तर मंगळवेढा, बार्शी, माळशिरस या तालुक्‍यात रूग्णसंख्या मोठी आहे. या पार्श्‍वभूमीवर परिस्थितीची पाहणी करणे, रूग्ण व मृत्यूदरवाढीच्या कारणांचा शोध घेऊन उपाय सूचविण्याच्या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील या मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाला उपाययोजनांच्या अनुषंगाने काही सूचना केल्या आहेत. (solapur covid19 preventive vaccination dr archana patil)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT