श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना esakal
सोलापूर

Solapur : दामाजी’ने एफआरपीचा शब्द पाळला : पाटील

कारखान्याला ऊस गाळपासाठी आणण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ डिजिटल टीम

मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगामात गळीतास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची उर्वरित रक्कम प्रतिटन ११० रूपये प्रमाणे ४ कोटी २७ लाख रूपये दिली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या धनश्री महिला पतसंस्थेच्या सर्व शाखांमधील संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही दिवाळीपूर्वी वर्ग केली आहे. यंदाचा हंगाम सुरु करण्यापूर्वी राहिलेली एफआरपी रक्कम देण्याबाबत दिलेल्या शब्द पूर्ण केल्याने ऊस उत्पादकांनी गळीतासाठी आपला ऊस देऊन कारखान्याच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केले.

चालू गळीत हंगामातील पहिल्या साखर पोत्याचे पूजन रतनचंद शहा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहूल शहा, जिजामाता पतसंस्थेचे प्रमुख रामकृष्ण नागणे, यांच्यासह उपाध्यक्ष तानाजी खरात यांचे हस्ते करण्यात आले.

अध्यक्ष पाटील म्हणाले की, नव्या संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या गळीत हंगामाच्या मोळी पूजनप्रसंगी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी एफआरपी रकम अदा करण्याबाबत माजी आमदार प्रशांत परिचारक, भगीरथ भालके, धनश्री पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजी काळुंगे, रतनचंद शहा बॅकचे राहूल शहा, बळीराजाचे दामोदर देशमुख, जिजामाताचे रामकृष्ण नागणे, अ‍ॅड नंदकुमार पवार,यांच्या मागदर्शनाखाली शब्द दिला होता.त्याप्रमाणे शब्द खरा केला.

कारखाना स्थळावर साखर पोती पूजन प्रसंगी कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, तसेच चंद्रशेखर कोंडूभैरी, पिंटू शिंदे, धनाजी बिचुकले, सुरेश पाटील, प्रमोद पुजारी, शुभम पुजारी, सिध्दे्श्‍वर डोके, राजू रणे, गेना दोलतडे, तसेच कारखान्याचे चिप इंजिनिअर धैर्यशील जाधव, चिफ केमिस्ट रमेश जायभाय, चिफ अकौंटंट रमेश गणेशकर, मुख्य शेती अधिकारी कृष्णात ठवरे, कार्यालय अधीक्षक दगडू फटे, सिव्हील इंजिनिअर प्रविण मोरे, परचेस ऑफिसर येताळा सावंजी, स्टोअरकिपर उत्तम भुसे, गोडावून किपर विश्‍वास पवार, हेड टाईम किपर आप्पासोा शिनगारे, केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे कामगार संघटनेचे विठ्ठल गायकवाड, कामगार पतसंस्थेचे विश्‍वास सावंजी यांच्यासह ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार,सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT