सोलापूर

अबब... वाचा, सोलापूर जिल्हा बॅंकेच्या ठेवींचे टार्गेट

मिलिंद गिरमे

लवंग (ता. माळशिरस, जि. सोलापूर) ः बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन व व्हिजन 20-20च्या माध्यमातून जिल्हा बॅंकेने मोठ्या प्रमणात ठेवी मिळवल्याने जिल्हा बॅंकेच्या 208 शाखांमध्ये सोने तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज व जेएलजी ग्रुप कर्जवाटप चालू करण्यात आले आहे. 31 मार्च 2020 अखेर तीन हजार 300 कोटींच्या ठेवी मिळवण्याचे जिल्हा बॅंकेचे उद्दिष्ट असून व्हिजन 20-20च्या माध्यमातून सर्व कर्मचारी दिलेले टार्गेट पूर्ण करतील, असे सोलापूर जिल्हा बॅंकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी सांगितले. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक अकलूज येथे माळशिरस तालुका कर्मचारी आढावा बैठक जिल्हा बॅंकेचे प्रशासक कोतमिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. कोतमिरे म्हणाले, ""मी 28 सप्टेंबर 18 ला जिल्हा बॅंकेचा कार्यभार घेतला. बॅंकेच्या ताळेबंदाचा अभ्यास करून बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला. शाखानिहाय प्रत्येक कर्मचाऱ्याला वैयक्तिक टार्गेट दिले. व्हिजन 20-20 हा दुसरा प्लॅन तयार केला. त्यानुसार 31 मार्चला तीन हजार 300 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व कर्मचारी अतिशय उत्स्फूर्त प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. बॅंकेने चालू केलेल्या सोने तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, जेएलजी ग्रुप कर्ज या सर्व कर्ज वाटपांची वसुली 100 टक्के आहे. महाराष्ट्रात मायक्रो एटीएमद्वारे सेवा देणारी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक पहिली असून मायक्रो एटीएममुळे ग्राहकांना कोणत्याही बॅंकेच्या एटीएम कार्डद्वारे जिल्हा बॅंकेत मायक्रो एटीएमच्या आधारे पैसे काढता येत असल्याने मायक्रो एटीएम सेवेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला विकास महामंडळ यांना कर्जपुरवठा करण्याबाबत जिल्हा बॅंक विचार करत आहे. जिल्हा बॅंकेच्या अडचणीच्या काळात नागरी सहकारी बॅंकांनी जिल्हा बॅंकेला सहकार्य केले. ते कधीही विसरता येणार नाही.'' 

यावेळी बॅंकेचे सहायक व्यवस्थापक रावसाहेब जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने व्हिजन 20-20 साठी दिलेले सर्व टार्गेट 31 मार्चला पूर्ण करण्याचे कर्मचाऱ्यांच्या वतीने आश्‍वासन दिले. यावेळी सहायक व्यवस्थपक रावसाहेब जाधव, सिनियर बॅंक इन्स्पेक्‍टर उत्तम दीक्षित, अण्णासाहेब भडंगे, महिला विकास महामंडळाचे रणजित शेंडे आदींसह सर्व शाखांचे शाखाधिकारी, बॅंक इन्स्पेक्‍टर, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गर्भवती आई अन् आठ वर्षांचा मुलगा... एका रात्रीत देशाबाहेर! न्यायालयातील थरारक क्षण, CJJ Suryakant यांचा मोदी सरकारला फक्त एक सवाल!

Kolhapur Politics : कागलमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! तृतीयपंथी उमेदवाराचा लिंबू, अंडी फेकल्याचा आरोप; १० नगरपरिषदा, ३ नगरपंचायतींसाठी मतदान सुरू

Latest Marathi News Live Update : बीड शहरातील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मोठा गोंधळ

Solapur Crime : घरात कोणी नसताना १६ वर्षाच्या मुलीने लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने घेतला गळफास; तिने का उचललं टोकाचं पाऊल?

PMP Bus Pass : पास महागल्याने पीएमपीकडे पाठ; सहा महिन्यांत पासधारक ३२ टक्क्यांनी घटले

SCROLL FOR NEXT