4Blood_Donation_.jpg 
सोलापूर

मे महिन्यात का जाणवणार रक्ताचा तुटवडा

प्रशांत देशपांडे

सोलापूर : शहरातील सगळ्याच रक्तपेढ्यांत सध्या मुबलक रक्तसाठा आहे. महिनाभर पुरेल एवढा रक्तसाठा झाल्याने सगळ्याच रक्तपेढ्यांनी टप्प्याटप्प्याने रक्तदान शिबिरचे आयोजन करावे, असे आवाहन शिबिर आयोजकांना केले आहे. 

उन्हाळा आणि कोरोना पार्श्‍वभूमीवर फेब्रुवारी व मार्च महिन्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे "सकाळ'ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले. तसेच काही जणांनी वैयक्‍तिक रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. सध्या कोरोना व्हायरस पार्श्‍वभूमीवर "लॉकाडाउन' असल्याने शहरातील हॉस्पिटल बंद आहेत. रुग्णावरील शस्त्रक्रिया नंतर करणार असल्याने सध्या रक्ताची मागणी काही प्रमाणात कमी झाली आहे. शिबिरे मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्याने सध्या सर्व रक्तपेढ्येंत मुबलक रक्‍तसाठा आहे. मात्र, मे महिन्यात तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे रक्तदान शिबिर आयोजकांनी सध्या टप्प्याटप्प्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. 

मे महिन्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो 
सध्या रक्तपेढीत रक्तसाठा मुबलक आहे. मे महिन्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो, तेव्हा आपल्याकडील रक्त शासनाच्या आदेशानुसार पुणे, मुंबईला पाठवावे लागते. तेव्हा आयोजकांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. 
-नीलिमा कुलकर्णी, दमाणी रक्तपेढी, सोलापूर 

हॉस्पिटल बंद असून शस्त्रक्रिया नाहीत 
सध्या "लॉकडाउन'ने हॉस्पिटल बंद असून शस्त्रक्रिया होत नाहीत. त्यामुळे रक्ताची मागणी कमी झाली आहे. एक महिना पुरेल एवढाच रक्तसाठा सध्या आहे. 
- अजय जाधव, अक्षय रक्तपेढी, सोलापूर 

मे महिन्यात व्हावे शिबीराचे आयोजन 
सध्या पुरेसा रक्‍तसाठा असला तरी मे महिन्यात मात्र रक्ताचा तुटवडा जाणवणार असल्याने रक्तदात्यांनी पुढे येऊन शिबिर व रक्तदान करावे. 
-महम्मद म. रफीक, अतहर रक्तपेढी, सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT