police bandobast  sakal
सोलापूर

Solapur Ganeshotsav : ‘ग्रामीण’साठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ; अक्कलकोट, बार्शीसाठी ‘एसआरपीएफ’च्या दोन तुकड्या

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर -गणेशोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरवात होणार असून मोठमोठ्या मंडळांनी गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेची जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे. यंदा बाराशे होमगार्डसह एकूण तीन हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

जिल्ह्यातील जवळपास तीनशेहून अधिक गावात ‘एक गाव एक गणपती’ बसविण्याचा निर्णय झाला आहे. सार्वजनिक मिरवणुकांचा खर्च टाळून गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम ठेवून तरुणांनी शांततेत व आनंदात उत्सव साजरा करावा. वर्गणीसाठी कोणालाही जबरदस्ती करू नये, मिरवणुकीसाठी लावल्या जाणाऱ्या वाहनांना आरटीओचा परवाना आवश्यक आहे, वीज कनेक्शन देखील अधिकृत असावे, अशा पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. मोठ्या आवाजाचे वाद्य लावून ध्वनी प्रदूषण न करता पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका

गणेशोत्सवानिमित्त काही गावांमध्ये आगमन व विसर्जन मिरवणूक काढली जाते. त्यावेळी कोणीही सोशल मीडियावरील अफवांना दाद देऊ नये. आक्षेपार्ह मेसेज किंवा व्हिडिओ खात्री न करता व्हायरल करू नये, अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अशावेळी संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधून गणेशोत्सव आनंदात साजरा करावा.

मुस्लिम बांधवांनी गणेशोत्सवामुळे ईद-ए-मिलादची मिरवणूक २८ सप्टेंबरऐवजी धार्मिक सलोखा राखत २९ व ३० सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला. ज्यांनी धार्मिक सलोखा राखण्यासाठी योगदान दिले, त्यांचा प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत सन्मान करण्यात येणार आहे. गणेशोत्सव हा आनंदाचा उत्सव असल्याने सर्वांनी कायद्याचे पालन करून हा उत्सव साजरा करावा, सर्वांना उत्सवाच्या शुभेच्छा.

- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

पोलिसांचा असाअसणार बंदोबस्त

धिकारी

१६१

एसआरपीएफ तुकड्या

०२

होमगार्ड

१२००

पोलिस अंमलदार

१६००

नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी

१५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT