रमेश बारसकर
रमेश बारसकर sakal
सोलापूर

Solapur : लग्नाळू युवकांचा आता थेट मंत्रालयावर मोर्चा, सामाजिक कार्यकर्ते रमेश बारसकर यांची माहिती

राजकुमार शहा

मोहोळ : मोहोळ येथील ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश बारसकर यांनी गेल्या आठवड्यात विवाहयोग्य झालेले परंतु विवाहासाठी वधू मिळत नसल्याने अशा "लग्नाळू" युवकांचा सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने आता अशा युवकांचे संघटन करून मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन सुरू असल्याची माहिती बारसकर यांनी दिली.

सध्या समाजात विविध जाती धर्मात अपवाद वगळता मुलींची संख्या कमी आहे तर युवकांची संख्या मुली पेक्षा जादा आहे. त्यामुळे विवाहासाठी मुली मिळणे अडचणीचे झाले आहे. ही जागतिक समस्या झाली आहे. त्यात मुली व त्यांच्या आई-वडिलांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. त्या अपेक्षा मुलाचे आई-वडील पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे युवकांचे विवाह रखडले आहेत. याचा सर्वात जास्त फटका ग्रामीण भागातील युवकांना बसत आहे. आर्थिक स्थिती मजबूत असलेल्या शहरातील मुला मुलींचे विवाह जुळून येतात.

शासनाने गर्भपात न करण्याचा निर्णय केला आहे मात्र त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे मुलींची संख्या वरचेवर घटत असल्याचे बारसकर यांनी सांगितले. या सर्व समस्यांचा विचार करून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर युवकांचा मोर्चा काढला. सुरुवातीला या विषयाची चेष्टा करण्यात आली, तर कोणी याला राजकीय स्टंटबाजी म्हणून संबोधले. मात्र मोर्चानंतर आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रे दूरचित्र वाहिन्यांनी त्याची दखल घेतल्यानंतर याची दाहकता लक्षात आली. जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चा नंतर बारसकर यांनी आता मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे.

किमान 500 घोडे व इतर आवश्यक साहित्याची जुळवा जुळवा सुरू आहे. त्यासाठी बारसकर यांनी सर्व जाती धर्मासाठी व सर्वांना भरता येईल असा सोप्या पद्धतीचा फॉर्म तयार केला असून तो ऑनलाइन भरावयाचा आहे. त्यामुळे युवकांचा डाटा तयार होऊन नक्की किती युवक विवाह योग्य आहेत,यावर काय मार्ग काढता येईल हे त्यातून समोर येणार आहे. बारसकर यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT