Solapur Mahapalika 
सोलापूर

तिजोरी रिकामी! "एलबीटी'तून चालतोय "या' महापालिकेचा गाडा; उत्पन्नात तब्बल 400 कोटींची घट 

तात्या लांडगे

सोलापूर : मार्च अखेरला महसुली भरणा सर्वाधिक होतो; मात्र 23 मार्चपासून लॉकडाउन केल्याचा परिणाम महसूल वसुलीवर झाला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात महापालिकेला 473 कोटी 12 लाखांचा महसूल वसूल होणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेला 202 कोटी 47 लाखांची वसुली झाली आहे. तर एप्रिल, मे, जून 2020 या तीन महिन्यांत सुमारे सव्वासहा कोटींचा महसूल मिळाला आहे. दरमहा 43 कोटींची कर वसुली अपेक्षित असातानाही केवळ दोन ते चार कोटींचाच कर वसूल होत असल्याने महापालिकेची पंचाईत झाली आहे. 

महापालिकेला स्थानिक संस्था कर, कर आकारणी, गलिच्छ वस्ती सुधार योजना, हद्दवाढ, भूमी-मालमत्ता, मंडई, उद्यान, सार्वजनिक आरोग्य अभियंता, नगर अभियंता, आरोग्य विभाग, झोन क्रमांक एक ते आठ, सामान्य प्रशासन, हुतात्मा स्मृती मंदिर, क्रीडा विभाग, विधान सल्लागार, अभिलेखापाल या विभागांतून महापालिकेला सुमारे साडेचारशे कोटींचा महसूल मिळणे अपेक्षित होते. मात्र, मंडई, उद्यान, कर आकारणी, स्थानिक संस्था कर, क्रीडा विभाग, भूमी-मालमत्ता या विभागांकडून अपेक्षित वसुली झाली नाही. महापालिका आयुक्‍तांनी कर वसुलीसाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नियुक्‍त करूनही अपेक्षित कर वसुली झाली नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन, कामांसाठी काटकसर करावी लागत आहे. दरवर्षी महापालिकेला राज्य सरकारकडून एलबीटी करापोटी 212 कोटी 52 लाख रुपये मिळतात. त्यातून महापालिकेचा गाडा सुरू आहे. 

महापालिकेची आर्थिक स्थिती 

  • 2019-20 चे महसूल उद्दिष्ट : 473.12 कोटी 
  • वसूल झालेला महसूल : 203.46 कोटी 
  • 2020-21 चे उद्दिष्ट : 516.29 कोटी 
  • तीन महिन्यांतील अंदाजित वसुली 6.29 कोटी 
  • 15 महिन्यांतील महसुली तूट : 392.66 कोटी 

कोरोनामुळे कर वसूल होईना 
याबाबत महापालिकेचे मुख्य लेखापाल शिरीष धनवे म्हणाले, कोरोनामुळे महापालिकेच्या कर वसुलीवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. मागच्या वर्षी महापालिकेला 473 कोटींचा तर यंदा 516 कोटींचा कर मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अपेक्षित वसुली होत नसून नागरिकांनी वेळेत कर भरल्यास शहरातील विविध प्रभागांतील प्रलंबित कामे करण्यास मदत होईल. 

"मंडई'तून मिळाले अवघे नऊशे रुपये 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील मंडई बंद असून महापालिका आयुक्‍तांच्या नियोजनानुसार व पोलिसांच्या देखरेखीखाली शहरातील 21 ठिकाणी भाजीपाला विक्री होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या मंडई विभागातून दरवर्षी 25 लाखांचा कर वसूल होणे अपेक्षित असताना, त्यात मोठी घट झाली आहे. एप्रिल महिन्यात काहीच कर मिळाला नाही, तर मे आणि जून महिन्यात अवघे 900 रुपये मिळाल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Thane News: गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद, व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन

Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Latest Marathi News Live Update : सिंहगडचा विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी शिखर समितीकडे पाठवला जाणार

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT