X-Ray 
सोलापूर

मोठी ब्रेकिंग! "या' टेस्टसाठी महापालिकेस घ्यावी लागणार भाभा अणुसंशोधन केंद्राची परवानगी 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्याच्या तुलनेत सोलापुरात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले असून, त्यामध्ये सर्वाधिक व्यक्‍ती कामगार वस्तीतील आहेत. या पार्श्‍वभूमीवर विडी, वस्त्रोद्योग, यंत्रमाग, हातमाग उद्योगातील व्यक्‍तींच्या छातीचा एक्‍स-रे केला जाणार आहे. त्यासाठी सोलापूर महापालिकेने पाच पोर्टेबल एक्‍स-रे मशिन मागविल्या आहेत. मात्र, ही टेस्ट करण्यापूर्वी भाभा अणुसंशोधन केंद्राकडून परवानगी घ्यावी लागणार असून, त्यासाठी महापालिका पत्र पाठविणार आहे. 

सोलापूर शहरात दोन हजार 326 कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत 255 व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्यापैकी 17 टक्‍के मृत्यू कोरोनामुळे झाले नसून उर्वरित 83 टक्‍के व्यक्‍तींना पूर्वीचे आजार होते. मधुमेह, उच्च रक्‍तदाब, हृदयरोग, किडनी, मेंदूसंबंधित आजार असल्याने अधिक व्यक्‍तींचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमीवर कामगार वस्तीतील विडी, हातमाग, यंत्रमाग उद्योगातील नागरिकांच्या छातीचा एक्‍स-रे काढण्याचेही निर्देश दिले. त्यानुसार आता महापालिकेने पाच एक्‍स-रे मशिन मागविल्या आहेत. मात्र, त्यामध्ये रेडिएशन असल्याने त्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राची परवानगी घ्यावी लागणार आहे. 

महापालिकेने पाच पोर्टेबल एक्‍स-रे मशिन मागविल्या 
याबाबत महापालिकेचे उपायुक्त पंकज जावळे म्हणाले, सोलापूर शहरातील विडी, हातमाग, यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या छातीचा एक्‍स-रे काढले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने पाच पोर्टेबल एक्‍स-रे मशिन मागविल्या आहेत. मात्र, त्यात रेडिएशन असल्याने भाभा अणुसंशोधन केंद्राची परवानगी घ्यावी लागणार असून त्यासाठी पत्र पाठविले जाणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर एक्‍स-रे काढण्यास सुरवात केली जाणार आहे. 

ठळक बाबी... 

  • सोलापूर शहरातील सुमारे दोन लाख कामगारांच्या छातीचा केला जाणार सर्व्हे 
  • शहरातील एकूण मृत्यूपैकी 83 टक्‍के व्यक्‍तींचा मृत्यू कोरोनाव्यतिरिक्‍त अन्य आजारांमुळे 
  • घरोघरी जाऊन महापालिकेने पुन्हा केले व्यक्‍तींचे थर्मल स्कॅनिंग 
  • छातीच्या एक्‍स-रेसाठी महापालिकेने मागविल्या पाच पोर्टेबल एक्‍स-रे मशिन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

Pune News : महापालिकेच्या सर्वपक्षीय कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोची उधळपट्टी

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

SCROLL FOR NEXT