bribe-rupgandh 
सोलापूर

'या' महापालिकेच्या विधान सल्लागारानेच घेतली लाच 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : हद्दवाढ भागातील आईच्या जागेचा कर भरण्यासाठी त्या जागेवर नाव लावावे, यासाठी अर्जदाराने महापालिकेकडे अर्ज केला होता. महापालिकेने तो अर्ज विधान सल्लागारांकडे पाठविला. तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी विधान सल्लागार अरुण नागनाथ सोनटक्‍के याने 50 हजारांची लाच मागितली. शुक्रवारी (ता. 24) न्यायालयाच्या आवारात लाचेची रक्‍कम देण्याचे ठरले. यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा रचून सोनटक्‍के यास रंगेहाथ पकडले. 


सोलापूर महापालिकेच्या हद्दवाढ परिसरातील एका जागेच्या संदर्भात महानगरपालिका उपायुक्तांकडे तक्रार केली होती. त्याप्रकरणी मनपा उपायुक्तांनी अभिप्राय घेण्यासाठी महापालिकेचे विधान सल्लागार सोनटक्के यांच्याकडे हे प्रकरण पाठविले होते. त्यानंतर या प्रकरणामध्ये अभिप्राय तक्रारदाराच्या बाजूने करून देण्यासाठी विधान सल्लागार सोनटक्के याने लाच मागितली होती. त्यावर तक्रारदाराने सोलापूर लाचलुचपत विभागाकडे गुरुवारी (ता. 23) तक्रार दिली होती. लाचलुचपत विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी जिल्हा न्यायालयाच्या आवारात सोनटक्के याने लाचेची रक्‍कम स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपतचा सापळा असल्याचे समजताच सोनटक्के तेथून बेगमपेठच्या दिशेने पळाला. पोलिसांनी त्याला किडवाई चौक ते बेगमपेठ पोलिस चौकी दरम्यान पाठलाग करून पकडले. महापालिकेत आणून सायंकाळी त्याची चौकशी केली. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. सदर बझार पोलिस ठाण्यात लाचखोर सोनटक्केविरुद्ध फिर्याद दिली. ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाचे पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, सहायक फौजदार नीलकंठ जाधवर, श्रीरंग सोलनकर, चंद्रकांत पवार, पदभानभ चंगरपल्लू, सिद्धाराम देशमुख आदींनी पार पाडली. 


पळाला, पण पैसे दुचाकीतच ठेवले 
तक्रारदाराकडून लाचेची 50 हजारांची रक्‍कम विधान सल्लागार सोनटक्‍के याने स्वीकारली. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचल्याचा अंदाज आल्यावर सोनटक्‍के याने तिथून पळून काढला. किडवाई चौक ते बेगमपेठ पोलिस चौकीपर्यंत लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग केला. त्याच्याकडील दुचाकी ताब्यात घेतली. त्यावेळी त्याच्या दुचाकीतच पैसे आढळून आले, याचे अधिकाऱ्यांना आश्‍चर्य वाटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT