solapur rain update agriculture 20 percent sowing only rainfall weather monsoon Sakal
सोलापूर

Solapur Rain Update : मोहोळ तालुक्यात केवळ 20 टक्केच पेरणी, मोठ्या पावसाची गरज

शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर केवळ 20 टक्के पेरणी केली

राजकुमार शहा

मोहोळ : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला मात्र, मोहोळ तालुक्यात एकही दमदार पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर केवळ 20 टक्के पेरणी केली आहे.

पाऊस वेळेत न पडल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान जी पेरणी झाली आहे त्यात सोयाबीनची पेरणी ज्यादा झाली आहे. मोहोळ तालुक्याला मोठ्या पावसाची गरज आहे.

पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. 25 मे रोजी रोहिणी नक्षत्र सुरू झाले. त्यानंतर मृग, आद्रा आदी नक्षत्रे सुरू झाली. मात्र एकाही नक्षत्रात दमदार पाऊस झाला नाही. पाऊस नसल्याने व कडक उन्हामुळे विहिरी बोअर च्या पाण्याने तळ गाठला आहे.

त्यामुळे ऊस, मका या पिकासह द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, बोर या फळबागा धोक्यात आल्या आहेत. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. मात्र चारा नसल्याने व आहे तो महाग झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण झाली आहे.

मात्र दुधाचा दर व जनावराला लागणारे विविध खाद्य याचा ताळमेळ घातला तर दूग्ध व्यवसाय ही तोट्यातच आहे. उत्तम प्रकारे सांभाळलेल्या उसाचा चाऱ्यासाठी वापर होत असल्याने साखर कारखाने ही अडचणीत आले आहेत.

बैलांची संख्या कमी झाल्याने शेतीच्या मशागतीची सर्व भिस्त आता लहान ट्रॅक्टर वर आहे. आहे ती पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असताना, आष्टी तलाव परिसरातील महावितरणने 55 ट्रांन्सफार्मरच्या विद्युत पुरवठा खंडित केला आहे.

पिण्यासाठी पाणी राखीव ठेवल्याने केवळ दोन तासच विद्युत पुरवठा सुरू ठेवतात. त्यामुळे साडेतीन हजार एकर क्षेत्रावरील पिके व फळबागा धोकात आल्या आहेत.

मोहोळ तालुक्यात पेरणी झालेली खरीप, भाजीपाला व चारा पिके पुढीलप्रमाणे

मका-403 हेक्टर, तुर-165, उडीद- 146, मूग-6, सोयाबीन-762, अडसाली ऊस- 89 चारा पिके

मका (खरीप)- 429 हेक्टर, कडवळ- 240, लसूण घास-8, नेपीअर घास-13, भाजीपाला पिके कांदा-13 हेक्टर, टोमॅटो-124, मिरची- 38, वांगी-22, भेंडी-16, दोडका-6, गवार- 4,

फुल पिके

झेंडू-14 हेक्टर

गुलाब-1

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT