logo esakal
सोलापूर

सोलापूरचे तापमान 42.1! दररोज अकराशे मेगावॉट वीजेचा वापर

15 दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठी साडेआठशे मेगावॉट वीज लागत होती. पण, सध्या विजेची मागणी अकराशे मेगावॉटवर पोचली आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक 42.1 अंश तापमानाची नोंद झाली. उन्हाचा तडाखा वाढल्यास वीजेची मागणी आणखी वाढेल, असेही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तात्या लांडगे

सोलापूर : उन्हाचा तडाखा वाढल्याने जिल्ह्यात विजेची मागणीही वाढू लागली आहे. 15 दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठी साडेआठशे मेगावॉट वीज लागत होती. पण, सध्या विजेची मागणी अकराशे मेगावॉटवर पोचली आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक 42.1 अंश तापमानाची नोंद झाली. उन्हाचा तडाखा वाढल्यास वीजेची मागणी आणखी वाढेल, असेही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

उन्हाळ्याच्या सुरवातीलाच तापमानाने उच्चांक गाठायला सुरवात केली आहे. उन्हापासून बचाव होण्यासाठी नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिक, लहान मुले हे दुपारी नंतर घराबाहेर फिरणे टाळत आहेत. त्यामुळे घरात पंखा, कूलर, एसी, फ्रीज अशा इलेक्‍ट्रिक उपकरणांचा वापर वाढला आहे. बाजारातून अशा वस्तूंची विक्रीदेखील वाढू लागली आहे. स्वाभाविकपणे त्यामुळे विजेची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यासाठी दररोज 28 हजार मेगावॉट वीज लागत असून, मागच्या वर्षी याच दिवसांमध्ये 20 हजार 800 मेगावॉट वीज लागत होती. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात महावितरणचे एकूण पावणेअकरा लाख ग्राहक आहेत. त्यात तीन लाख 68 हजार कृषीपंपाचे ग्राहक आहेत. उन्हामुळे घरगुती ग्राहकांकडून विजेची मागणी वाढल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. मागील 15 दिवसांत तब्बल 250 मेगावॉटने विजेची मागणी वाढल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. दरम्यान, ग्राहकांनी वेळेवर वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यातील विजेचे ग्राहक
घरगुती ग्राहक
6,11,921
व्यावसायिक ग्राहक
61,075
औद्योगिक ग्राहक
18,032
शेतीचे ग्राहक
3,68,139

दरमहा 250 कोटींची वीजबिले
घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा सात लाख ग्राहकांना दरमहा 125 कोटींची बिले महावितरणकडून पाठविली जातात. तर दर तीन महिन्याला शेतीपंपाची बिले संबंधित शेतकरी ग्राहकांना पाठविली जातात. त्याची रक्‍कमही जवळपास 125 कोटी रुपयांपर्यंतच असते. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच विजेची मागणी वाढल्याने एप्रिल-मे महिन्यात जिल्ह्यासाठी दररोज किमान दीड हजार मेगावॉटपर्यंत वीज लागू शकते, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak: 'तो' पेपर फुटलाच नव्हता? तक्रारच बनावट? तक्रारदाराने 'ई-मेल'मध्ये काय म्हटलंय?

Manoj Jarange: मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा सुरू होणार? २९ जुलैला मनोज जरांगे काय घोषणा करणार? आंदोलनाच्या पुढील दिशेवर निर्णय लवकरच

Latest Marathi News Live Update: दिल्लीचे कडकडडूमा न्यायालय ३१ जुलै रोजी ताहिर हुसेन आणि इतर दोषींना शिक्षा सुनावणार

Heritage Alert: टाकळी राजेरायची ऐतिहासिक वेशी ढासळली; प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर

Pandharpur Ashadhi Wari AI count : आषाढी वारीत पंढरपुरात विक्रमी 32 लाख भाविक; एआय तंत्रज्ञानातून अचूक मोजणी, दुबार नोंदणीला आळा

SCROLL FOR NEXT