Solapur Sakal
सोलापूर

Solapur : 'बेकरीजन्य पदार्थ व फास्ट फूड रोखण्याचा प्रयत्न'; ZP च्या शाळेत टिफीन मॉनेटर

शाळेने या अगोदर मुलांच्या आहारात सर्व प्रकारच्या पालेभाज्या खाण्यात याव्यात म्हणून 'व्हिजिटेबल बँक' जिल्ह्यात सर्व प्रथम 'वॉटर बेल' हा उपक्रम राबविला होता.

राजकुमार शहा

पापरी ता.मोहोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेने आता "टिफिन मॉनिटर" हा नवीन उपक्रम शाळेत सुरू केला असून, जिल्ह्यात प्राथमिक शाळेत प्रथमच हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनोखा उपक्रम राबविला जात असल्याची माहीती मुख्याध्यापक श्रीकांत खताळ यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासा बरोबरच त्यांच्या शारीरिक व सर्वांगीण विकासा साठी पापरी येथील जिल्हा परिषद शाळा व उपक्रमशील शिक्षक नेहमी प्रयत्नशील असतात. शाळेने या अगोदर मुलांच्या आहारात सर्व प्रकारच्या पालेभाज्या खाण्यात याव्यात म्हणून 'व्हिजिटेबल बँक' जिल्ह्यात सर्व प्रथम 'वॉटर बेल' हा उपक्रम राबविला होता.

तो सर्व जिल्ह्यातील शाळानी राबाविला. दोन्ही उपक्रम अद्यापही सुरू असून या चालू शैक्षणिक वर्षापासून आता शाळेने "टिफिन मॉनिटर" हा नवीन उपक्रम सुरू केला आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना मुख्याध्यापक खताळ म्हणाले, शहरी भागातील नागरीका प्रमाणेच ग्रामीण भागातील नागरीकांचेही जीवनमान आता उंचावले आहे. दररोजच्या जेवणाच्या सवयी बदलत आहेत. "फास्ट फूड" चे फॅड वाढते आहे.

शहरी भागा प्रमाणेच ग्रामीण भागातही आता बेकरी तसेच फास्ट फूड व इतर तयार पदार्थ सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. शेती कामाचे व्याप,मजूर टंचाई या सारख्या अडचणीमुळे स्वयंपाकाला उशीर होतो,

कधी कधी ज्यादा तासा मुळे, शेतातून शाळेत यायला उशीर नको म्हणून मुले ही घरून लवकर निघतात. शाळेत वेळेवर पोषण आहार मिळतोच परंतु मुलं लवकर घरून शाळेत जात असल्याने उपाशी राहायला नको म्हणून काळजी पोटी पालक त्यांना टिफिन मध्ये ब्रेड, सँडविच,केक,नूडल्स, कुरकुरे,बिस्किटे किंवा बाजारातील, दुकानातील पॅक मध्ये मिळणारे अन्न पदार्थ देतात.हे एखाद्या वेळी ठीक आहे ,परंतु कांही मुले ही पालकाना वारंवार

तेच खायला मागतात, याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.बेकरी जन्य पदार्थ व फास्ट फूड सतत खाण्यात येत असल्याने स्थूलता वाढून लठ्ठपणा येतो. सर्व जीवनसत्व समावेशक अन्न खाल्ले जात नसल्याने लवकर चष्मा लागणे, या सारख्या अनेक समस्याना मुलांना लवकर सामोरे जावे लागत असल्याचे मुख्याध्यापक खताळ यांनी सांगीतले.

मुलांचे उत्तम शारीरिक स्वास्थ्य हे सर्व समावेशक पोषण युक्त आहारानेच चांगले राहते. मुलांचे हेच वय सदृढ व निरोगी शरीर राखण्याचे. ही गोष्ट विचारात घेऊन "टिफिन मॉनिटर" हा उपक्रम राबविणे सुरू केले असल्याचे खताळ यांनी सांगितले.

असा आहे टिफिन मॉनिटर उपक्रम प्रत्येक वर्ग निहाय विध्यार्थी व विध्यार्थीनी यांची स्वतंत्र "टिफिन मॉनिटर"ची वर्ग शिक्षकानी नेमणूक केली आहे. हे टिफिन मॉनिटर जेवणा च्या वेळी विद्यार्थ्यांना टिफिन मध्ये आईने आठवड्यातून किती वेळा फास्ट फूड,बेकरीचे पदार्थ दिले आहेत याची नोंद करतात व त्याचा प्रत्येक आठवड्याचा अहवाल आपल्या वर्ग शिक्षकाकडे देतात.

त्यात कोणता विद्यार्थी आठवड्यातून किती वेळा फास्ट फूड आणतो याचे निरीक्षण केले जाते. वर्ग शिक्षक अहवाल आल्या नंतर विध्यार्थ्याच्या पालकांना बोलवून त्यांना योग्य सूचना देतात व सर्व समावेशक पोषण आहार देण्याबाबत मार्गदर्शन करतात.

प्रतिक्रिया

बेकरीजन्य पदार्थ व फास्ट फूड च्या वारंवार सेवनाने लठ्ठपणा वाढतो, तो या उपक्रमाद्वारे रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे. व्हिजिटिबल बँक व वॉटर बेल हे या पुर्वीचे दोन उपक्रम यशस्वी ठरले आहेत. आता हा ही उपक्रम यशस्वी करू, असा उपक्रम राबविणारी जिल्ह्यातील पहिलीच प्राथमिक शाळा आहे.

राजेंद्र शेळके अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती,पापरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT