tomato sakal
सोलापूर

Solapur : टोमॅटो ४० पैसे प्रतिकिलो ; संतप्त शेतकऱ्याचा शेतमाल रस्त्यावर फेकून रास्ता-रोको

या हंगामात उत्पादित झालेल्या टोमॅटोस कवडी मोलाचा दर मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मोडनिंब - टोमॅटोच्या कोसळलेल्या दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने पुणे- सोलापूर महामार्गावर टोमॅटो फेकून आंदोलन केले. शेटफळ येथे माढा रस्त्यालगत झालेल्या या आंदोलनाने सुमारे अर्धा तास महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली.

या हंगामात उत्पादित झालेल्या टोमॅटोस कवडी मोलाचा दर मिळत आहे. उत्पादनावर होणारा खर्चही भागत नाही. अशातच शेटफळ येथील हनुमंत जाधव या शेतकऱ्याचा जवळपास पाच टन टोमॅटो व्यापाऱ्यांनी ४० पैसे प्रतिकिलो दराने मागितले. टोमॅटो तोडणी, वाहतूक व हमालीचा खर्च जवळपास प्रतिकिलो दीड रुपया होतो.

शिवाय लागवडीपासून आजपर्यंत झालेला लाखो रुपयांचा खर्च वेगळाच. अशातच २५ किलोच्या टोमॅटोच्या कॅरेटला दहा रुपये दराने व्यापाऱ्यांनी मागितल्यामुळे संतप्त झालेल्या या शेतकऱ्याने सर्व टोमॅटो महामार्गावर फेकून दिले. संतप्त शेतकऱ्याच्या या आंदोलनास अनेक शेतकऱ्यांनी पाठिंबा व्यक्त करत टोमॅटो दराबाबत रोष व्यक्त केला. लाखो रुपये खर्च करून, रात्रंदिवस राबूनही श्रमाची किंमत होत नसल्याची उद्विग्नता या तरुण शेतकऱ्याच्या या अचानक झालेल्या आंदोलनात दिसून आली.

माझे टोमॅटोचे दोन एकराचे क्षेत्र आहे. जवळपास यासाठी अडीच लाख रुपये खर्च झाला. एक आठवड्यात जवळपास १००० कॅरेटचे उत्पादन होते. आजपर्यंत केवळ ७० हजार रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. नफा राहू द्यात, उत्पादन खर्चही निघत नाही. शासनाने टोमॅटोला पंधरा रुपये प्रतिकिलो हमीभाव द्यावा. वावरभर मातीत पैसे फेकूनही आमच्या मालाची ही किंमत होत असेल तर आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय नाही.

हनुमंत जाधव, टोमॅटो उत्पादक शेतकरी, शेटफळ, ता. मोहोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT