solapur farmer news esakal
सोलापूर

Solapur : टोमॅटोचा लाल चिखल, कांद्याचा रेंदा

बार्शी तालुक्यातील बळिराजावर अस्मानी अन्‌ सुलतानी संकट; शेतकरी पिचला

सकाळ डिजिटल टीम

मळेगाव : बार्शी तालुक्यात परतीच्या पावसाचे सुरू असलेले धुमशान काय थांबायचे नाव घेईना असे झाले आहे. मळेगाव परिसरातील साकत, पिंपरी, हिंगणी, उपळे, ढाळे पिंपळगाव, हिंगणी धरणक्षेत्र परिसरात सलग सात दिवस झालेल्या अतिवृष्टीत सोयाबीन, कांदा, द्राक्ष, टोमॅटो, मका, पपई, तूर आदी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

काढणीला आलेल्या सोयाबीन पिकास कोंब फुटू लागले आहेत. टोमॅटोचा लाल चिखल झाला. कांद्याचा रेंदा झाला, छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत पोग्यात असलेले द्राक्ष घड विरघळून गेले आहेत. अनेक ठिकणी शेताचे बांध फुटून शेतातील माती वाहून गेली आहे. या अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी हतबल व निराश झाला आहे.

पिंपरी (सा) येथील शेतकरी अनिल आत्माराम काटमोरे यांनी दीड एकर शेतात टोमॅटोची लागवड केली. अंदाजे एक लाख रुपये इतका खर्च करून चमकदार,दर्जेदार टोमॅटो पिकवले. दोनवेळा टोमॅटो बाजारात विक्रीसाठी पाठवले, त्यातून नाममात्र रक्कम मिळाली.

त्यानंतर परतीच्या पावसाच्या तडाख्यात टोमॅटोचे दरही घसरले आणि शेतात टोमॅटोचा लाल चिखलही झाला. अनिल काटमोरे यांच्या शेतातील टोमॅटो, सोयाबीन, कांदा या तिन्ही पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुलांचे शिक्षण, कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे.

सोयाबीनचे पंचनामे झाले, फळबागांचे पंचनामे झाले. मात्र नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. हतबल व उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाने नुकसानभरपाई रक्कम देऊन मदतीचा हात द्यावा अशी विनंती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Hockey India League : नवनीत कौर आणि जर्मनप्रीत सिंग करणार एसजी पायपर्सचे नेतृत्व; उपकर्णधारांचीही घोषणा

मोठी बातमी! शाळा बंद आंदोलनातही सुरू होत्या २१६२ शाळा; सोलापूर जिल्ह्यातील १७,८०० शिक्षक शाळा बंद आंदोलनासून राहिले दूर

Mumbai Crime: व्हिसा नसताना भारतात आला, 72 लाखांच्या कोकेनसह पोलिसांनी पकडला

Mephedrone Seized : हडपसरमध्ये मेफेड्रोन विक्री करणाऱ्यास अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT