Vitthalrao Shinde Sugar Factory
Vitthalrao Shinde Sugar Factory esakal
सोलापूर

Solapur : शिंदे कारखाना युनिट दोनचा गळीत हंगाम शुभारंभ

सकाळ डिजिटल टीम

करकंब : करकंब (ता. पढरपूर) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नंबर दोनचा गाळप हंगाम शुभारंभ राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या शुभहस्ते व जयवंत महाराज बोधले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी संचालक विष्णु हुंबे व त्यांच्या पत्नी वंदना हुंबे यांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापूजा पार पडली.

यावेळी शेखर गायकवाड यांनी साखर कारखाना म्हणजे ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीचा कणा आहे. पंढरपूर भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने करकंब कारखाना सुरू होणे गरजेचे होते. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने करकंब कारखाना खरेदी करून तीन हंगाम यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. हा कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न मार्गी लागला असून त्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना गत हंगामातील ऊस बील दिल्या नंतरच राज्यातील साखर कारखान्यांना या हंगामासाठी गाळप परवाना साखर आयुक्त कार्यालाकडून देण्यात आलेला आहे.

गाळप हंगामासाठी कारखान्याकडे ७ हजार ९०४ हेक्‍टर ऊस क्षेत्राची नोंद असून अंदाजे ७ लाख मे. टन ऊस गळीतास उपलब्ध होईल. गाळप हंगामासाठी सर्व यंत्रणा यंत्रणा सज्ज झाली असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले. संचालक सुरेश बागल, पोपट गायकवाड, लाला मोरे, पांडूरंग घाडगे, सचिन देशमुख, कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे, जनरल मॅनेजर एस. आर. यादव, एस. एस. महामुनी, बी. जे. साळुंके, बी. डी. इंगवले, ढेकाने, पी. एस. येलपले, पी. व्ही. बागल, थिटे, डी. डी. लव्हटे, बंडगर, जे. डी. देवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT