सोलापूर

पक्षनेता व विरोधी पक्षनेत्याबद्दल "या' अध्यक्षांनी केले भाष्य 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः जिल्हा परिषदेमध्ये पक्षनेता व विरोधी पक्षनेता या पदावर कोण विराजमान होणार याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. या निवडी होणार की नाही याबाबतही बरीच खलबते सुरू होती. मात्र, त्या सगळ्या प्रश्‍नांवर आज तोडगा निघाला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सगळ्यांशी चर्चा करून या दोन्ही निवडी करणार असल्याचे आज सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीमध्ये भाजप-समविचारी आघाडीने बाजी मारली होती. तशीच अपेक्षा त्यांना विषय समित्यांच्या सभापती निवडीबाबत होती. मात्र, विषय समिती सभापती निवडीमध्ये भाजप-समविचारी आघाडीला चारपैकी केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे जिल्हा परिषदेत असलेल्या एकूण सहा पदाधिकाऱ्यांपैकी तीन पदाधिकारी भाजप-समविचारी आघाडीचे तर तीन पदाधिकारी महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत दोघांचीही समान सत्ता आली आहे. अशावेळी पक्षनेता व विरोधी पक्षनेता म्हणून कुणाची निवड करायची याबाबत पेच निर्माण झाला आहे. दोन्ही गटांना समान संधी असल्यामुळे ही पदे नेमकी कुणाकडे द्यायची याबाबत खलबते सुरू आहेत. 

जिल्हा परिषदेच्याबाबतीत काही राजकीय धुरीणांनी पक्षनेता व विरोधी पक्षनेता ही दोन्ही पदे आहे तीच कायम ठेवली जातील, अशी शक्‍यता वर्तविली होती. मात्र, आज अध्यक्ष कांबळे यांनी या दोन्ही निवडी सगळ्यांशी चर्चा करून नव्याने केल्या जातील, असे वक्तव्य केल्यामुळे त्या पदावर कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे. पक्षनेता पदासाठी जे काही तीन-चार जण इच्छुक असतील त्यांना एकत्र बसून तुम्हीच एकाचे नाव अंतिम करण्यास आपण त्यांना सांगणार आहोत. त्यांच्याकडून सामोपचाराने जर नाव अंतिम नाही झाले तर आपण त्यांच्यापैकी एकाची निवड करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तीच स्थिती विरोधी पक्षनेत्याबाबतही असेल, असेही श्री. कांबळे यांनी सांगितले. 

अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी एकाही वेळी जिल्हा परिषदेत राष्ट्रीय सणाला ध्वजारोहण केले नाही. उपाध्यक्ष किंवा अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांच्या काळात ध्वजारोहण झाले. मात्र, आता जवळपास तीन वर्षांनी अध्यक्ष श्री. कांबळे जिल्हा परिषदेत प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहण करणार आहेत. 

महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ विरोधात कोल्हापुरात विराट मोर्चा; सतेज पाटील, राजू शेट्टी करणार नेतृत्व

London Wari: सातासमुद्रापार पोहोचली विठ्ठलभक्ती! लंडनहून निघाली पंढरीची वारी; प्रथमच लंडन ते पंढरपूर ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’

Nagpur: महागाई, गुन्हेगारीविरोधात ‘रास्ता रोको’; विदर्भवाद्यांचा एल्गार; पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट, १७ ताब्यात

Suryakumar Yadav: श्रेयसकडे कॅप्टन्सी जाताच सूर्यकुमार यादवचं रौद्ररूप; फक्त ३६ चेंडूंत उडवला धुरळा, वाचा नेमकं काय घडलं"

SCROLL FOR NEXT