सोलापूर

संघर्षगाथा... दु:खाचा डोंगर कोसळला मात्र 'ती' डगमगली नाही

सुस्मिता वडतिले

सोलापूर ः आयुष्याचा जोडीदार सोडून गेला आणि अविता कृष्णात जांभळे यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला. सुरू असलेल्या सुखी संसाराच्या गाडीचे एक चाक निखळले. घरातील कर्ता पुरुषच कायमचा निघून गेल्याने संसार उघड्यावर आला. मात्र, अशा परिस्थितीतही हार न मानता अविता जांभळे पतीच्या पश्‍चात्त्य तीन मुलांचा संसार नेटाने चालवत आहेत. आज मुलांच्या साथीने अविता यांनी भाजी विक्रीतून संसाराची हिरवळ फुलवली आहे. 

तांदूळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे राहणाऱ्या अविता कृष्णात जांभळे यांची ही कथा आहे. अविता यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. आई-वडील शेतात काम करायचे. घरची आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची होती, की शेतात काम केले तरच पोट भरत होते. त्यामुळे आई-वडिलांनी अविता यांचा वयाच्या 17व्या वर्षीच कृष्णात जांभळे यांच्याशी विवाह लावून दिला. कृष्णात हे भाजी विक्रीचा व्यवसाय करून सोलापूरच्या शेंगामिलमध्ये काम करत होते. या दोघांचा संसार सुखाचा सुरू होता. त्यांना मुलगी साक्षी, मुरारी आणि मुलगा विश्‍वनाथ अशी अपत्ये आहेत. 
पण म्हणतात ना, नियतीचा खेळ वाईट असतो. तसाच प्रकार अविता यांच्याबाबत घडला. पती कृष्णात कामावरून घरी येत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. यातचे त्यांचे निधन झाले. अचानकच आयुष्याचा जोडीदार सोडून गेल्याने या माऊलीवर दु:खाचा डोंगरच कोसळला. सुरू असलेल्या सुखी संसाराच्या गाडीचे एक चाक निखळले आणि कुटुंबच उघड्यावर आले. त्यावेळी अविता यांना तीन मुलांना घेऊन काय करावे, हे सुचत नव्हते. जगावे की मरावे, अशी मन:स्थिती झाली होती. पण, मुलांचा सांभाळ करण्यासाठी जगणे भागच होते. त्यानुसार या दु:खातून स्वत:ला सावरत त्या शेतात काम करायला जाऊ लागल्या. 

शेतात दिवसाला 120 रुपये मजुरी मिळत होती. परंतु त्यातूनही घर भागत नव्हते. पतीच्या दवापाण्यासाठी झालेल्या खर्चाच्या कर्जाचा डोंगर डोक्‍यावर उभा होता. डोक्‍यावर एक लाखांचे कर्ज आणि तीन मुलांचा सांभाळ कसा करायचा, या विचारात तहान-भूक हरपली होती. शेत मजुरीवर हे सर्व भागत नव्हते म्हणून त्यांनी शिलाईकाम सुरू केले. यातून थोडेफार घर भागत होते. जरा कुठे घर सुरळीत चालू होते त्यातच मोठा मुलगा आजारी पडला. त्याच्या दवाखान्याच्या खर्चात पुन्हा 60-70 हजार रुपयांचे कर्ज झाले. या जगण्याच्या संघर्षात संकटे अजून पाठ सोडायला तयार नव्हती. त्यातच सुरू असलेले कामही बंद पडले. मुलाच्या आजारपणावर उपचार करतच त्या कामासाठी भटकत होत्या. 

अशा संकटावेळी अविता यांना एक देवमाणूस भेटला. त्याने अविता यांना सांगितले की, "तू घाबरू नकोस, तुझे पती भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते. तसेच तूही भाजी विक्रीचा व्यवसाय करायला सुरवात कर.' पण, व्यवसाय सुरू करायला जवळ पैसे तर असायला हवेत ना. आधीच कर्जबाजारी झालेल्या या माऊलीच्या मनात भीतीचे घर तयार झाले होते. त्यावेळी त्या माणसाने धीर दिला आणि भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू करायला मी मदत करतो असे सांगितले. त्यावेळेस हे ऐकून तिलाही आधार वाटला. "मुलांना वडील नसले तरी चालेल पण आई हवी. तूच खचलीस तर तुझ्या मुलांना कोण सांभाळणार,' हे तिला त्याने समजावून सांगितले. मग अविता यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय करण्यास सुरवात केली. आता रोज पहाटे तीन वाजता उठून ही माऊली घरचे सर्व काम आवरून चार वाजता मार्केट यार्डमध्ये भाजी विकायला जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

SCROLL FOR NEXT