सोलापूर

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून 'या' चार नावांची चर्चा

तात्या लांडगे

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांपैकी राजन पाटील हे निवडणूक लढणार नाहीत. उर्वरित दोन उमेदवार विजयी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे दिलीप माने हेच तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे म्हणाले.

सोलापूर : नोव्हेंबर अखेर विधान परिषदेच्या काही जागा रिक्त होणार आहेत. डिसेंबर मध्ये विधान परिषदेसाठी निवडणूक होण्याची शक्यता असून त्यासाठी राष्ट्रवादीकडून माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील तर शिवसेनेतील माजी आमदार दिलीप माने यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा भाजपला मिळवून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या प्रशांत परिचारक यांना पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी मिळणार आहे. (some seats in the legislative council will be vacant by the end of november)

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेली पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल, असा सर्वांना विश्वास होता. मात्र, प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे यांना साथ दिली आणि भावनिकतेचे राजकारण विसरून जनतेने भाजपच्या उमेदवाराला या ठिकाणी निवडून दिले. ढीगभर मंत्री प्रचारासाठी येऊनही राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा गमावली आणि हा पराभव राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जिव्हारी लागला. या पार्श्वभूमीवर आता विधानपरिषदेची जागा तरी हातातून जाऊ नये, या दृष्टीने राष्ट्रवादीने तुल्यबळ उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. दरम्यान, दीपक साळुंखे-पाटील यांचा मागील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेत्यांबरोबर त्यांचे हितसंबंध दुरावल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे राजन पाटील हे या निवडणुकीसाठी इच्छुक नाहीत.

जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील हे नवखे असून विधान परिषदेचे जागा ते जिंकू शकतात, अशी सध्या परिस्थिती नाही. त्यामुळे दिलीप माने हे उमेदवार कसे आहेत, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी पदाधिकाऱ्यांना विचारणा केली आहे. परंतु, पक्षाकडून त्यांच्या नावाचा विचार सुरू असला तरीही उमेदवार नक्की कोण असेल, हे अद्यापही खात्रीशीरपणे सांगता येत नसल्याचेही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे आवर्जून म्हणाले. ज्येष्ठ माजी आमदार गणपतराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार संजय शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील यांच्यासह इतर नेते मंडळींशी दिलीप माने यांचे चांगले संबंध आहेत. सर्वांनी नेटाने प्रयत्न केल्यास ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस निश्चितपणे जिंकू शकते, असा विश्वासही जिल्हाध्यक्ष साठे यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केल्याचे त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

पक्षीय बलाबलाचा घेतला जातोय अंदाज

जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद, पंचायत समित्या व महापालिका आणि जिल्हा परिषदेमधील जवळपास सव्वाचारशे मतदार विधान परिषदेसाठी मतदान करणार आहेत. डिसेंबरमध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता असल्याने कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहेत. आपला उमेदवार विजयी होण्यासारखी परिस्थिती आहे का, किती मतदान होऊ शकते आणि त्यासाठी काय रणनीती आखावी लागेल, या दृष्टीने पक्षश्रेष्ठीने जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्याकडून अहवाल मागवला असल्याची चर्चा आहे. दरम्यान सध्या चर्चेत असलेल्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांपैकी दिलीप माने हेच तुल्यबळ उमेदवार असल्याचे जिल्हाध्यक्ष साठे यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.(some seats in the legislative council will be vacant by the end of november)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT