udid.jpg 
सोलापूर

शेतकऱ्यांचा माल येताच उडदाचे भाव हमीभावापेक्षा झाले कमी 

नानासाहेब पठाडे

पोथरे(सोलापूर) : उडदाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान निर्माण झाले होते. मात्र शेतकऱ्यांचा उडीद विक्रीसाठी बाजारात आला की, दिड हजार रुपयांनी बाजार उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

यावर्षी करमाळा तालुक्‍यात खरीप हंगामातील उडदाची विक्रमी पेरणी झालेली आहे. पाऊस मध्यम स्वरूपाचा झाल्याने उडदाला उताराही चांगला मिळत आहे. शासनाने उडदाची आधारभूत किंमत सहा हजार रूपये ठरवली आहे. असे असतानाही सुरुवातीला उडीद सहा हजार सहाशे रूपये एक किंटल दराने विकला गेला. 

त्यानंतर पाच सहा दिवसातच उडदाचे बाजार एकदमच कमी झाले असून तो पाच हजार ते पाच हजार चारशे रुपये झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. किंटल मागे दीड हजार रुपये जर बाजार भाव एकदम कमी होत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचे. त्यामुळे यामागे व्यापाऱ्यांची संगनमत झाले की काय असा संशय शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. शासनाने याची दखल घ्यावी व शेतकर्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

शासनाने हमी भावाने खरेदी करावी 
माझ्याकडे पंधरा एकरात उडीद लावला आहे. बाजार कमी झाल्याने माझे किमान एक लाख रूपयाचे नुकसान होणार आहे. शासनाने कमी दराने उडीद खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. 
- राजेंद्र दादासाहेब सरडे शेतकरी करंजे 

व्यापाऱ्यांनी गैरफायदा घेऊ नये.

बाजार कमी झाले तरी पैशाची गरज असल्याने माल विकावाच लागणार आहे. आमच्या अडचणीचा व्यापाऱ्यांनी गैरफायदा घेऊ नये. किमान हमीभावाने तरी उडीद खरेदी करावा. 
- गणेश साबळे शेतकरी भालेवाडी  

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT