police death.jpg 
सोलापूर

सोलापूर - पुणे महामार्गावर भरधाव टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसाला उडविले; जागीच मृत्यू

अमोल व्यवहारे

सोलापूर : तपासणीसाठी थांबण्याचा इशारा केल्यानंतरही भरधाव वेगाने पळून जाणाऱ्या ट्रक चालकाने ट्रक वाहतूक पोलिसांच्या अंगावर घातल्याने पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सोलापूर - पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्‍याजवळ घडली. 

सागर चोबे असे या घटनेत मरण पावलेल्या महामार्ग पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून ट्रक चालक नवनाथ बिबटे ( रा. परळी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

रविवारी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार लट्टे व त्यांच्या पथकातील सहा ते सात कर्मचारी हे वरवडे टोलनाक्‍याजवळ वाहनांची तपासणी करीत होते. सांयकाळच्या सुमारास नवनाथ गुट्टे हा त्याच्या ताब्यातील आयशर ट्रक हैदराबाद वरून पुण्याकडे घेऊन जात होता. वरवडे टोलनाक्‍याच्या अलीकडे पोलीस शिपाई सागर चोबे याने बिबटेच्या ताब्यातील ट्रकला थांबण्याचा इशारा केला असतात त्याने ट्रक न थांबविता तसाच पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरुन घातला आणि पळून जाऊ लागला. या दुर्घटनेत पोलीस शिपाई सागर चोबे हे गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले असून इतर पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी टोल नाक्‍यावर ट्रक ताब्यात घेऊन ट्रक चालक गुट्टे यास ताब्यात घेतले. त्याला टेंभुर्णी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT