1Ankush_Shinde.jpg 
सोलापूर

सावधान ! घरात बसा नाहीतर जेलमध्येच रवानगी

तात्या लांडगे
सोलापूर : हातावर होम कोरन्टाईलचा शिक्‍का मारला असूनही संबंधित व्यक्‍ती घराबाहेर फिरताना दिसल्यास त्याची रवानगी थेट तुरुंगातच केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी दिला आहे. अशा व्यक्‍तींची माहिती नागरिकांनी तत्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही नक्‍की वाचा : टपाल खात्याचा मोठा निर्णय ! दिव्यांगांसह ज्येष्ठांना मिळणार घरपोच पैसे


राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार आता जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरु ठेवली जाणार आहेत. मात्र, त्याठिकाणी दोन व्यक्‍तींमध्ये तीन फुटांचे अंतर न दिसल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जाणार आहे. या दुकानांबाहेर अथवा मॉलमध्ये गर्दी होणार नाही, याचे संबंधितांनी ठोस नियोजन करावे, असेही पोलिस आयुक्‍त शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. पुणे, सातारा, नगर, सांगली या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांनी प्रत्येक क्षणी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. अमेरिकेतील नागरिक कोरोनाच्या भितीने लॉकडाउनचे पालन तंतोतंत करीत आहेत. त्याची दखल सोलापुकरांनी घ्यावी आणि विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, अन्यथा पोलिसांमार्फत कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही नक्‍की वाचा : रेल्वे कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी ! 260 कोटींची मदत


विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई
सरकारच्या निर्देशानुसार शहरातील जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरु राहतील. मात्र, संबंधितांनी ग्राहकांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील. होम कोरन्टाईलचा शिक्‍का मारलेला असतानाही संबंधित व्यक्‍ती घराबाहेर फिरताना दिसल्यास त्याची रवानगी थेट जेलमध्येच केली जाईल.
- अंकूश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर

हेही नक्‍की वाचा : कृपा पांडूरंगाची ! सोलापूर कोरोनापासून दूरच


अमेरिकेत लॉकडाउनचे तंतोतंत पालन
कोरोना या विषाणूचे देशावरील संकट दूर करण्याच्या हेतूने अमेरिकेतील नागरिक स्वत:हून घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्याचा सकारात्मक परिणामही दिसू लागला आहे. सोलापुकरांनी त्याची प्रेरणा घेऊन कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी सहकार्य करावे. स्वत:बरोबर कुटुंब सुरक्षित राहू शकेल, याची खबरदारी घ्यायला हवी. पोलिस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र, कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर येऊ नये. कोरोना हे वैश्‍विक संकट असून नागरिकांच्या सहकार्यातूनच ते हद्दपार होईल, असेही पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: सौदी अरेबियाने पाइपलाइन बंद केली, कच्च्या तेलात तेजी; गणेश चतुर्थीला पेट्रोल-डिझेल अन् LPG चे दर किती?

Maratha Reservation: मुंबई पोलिसांची परवानगी नाकारली तरी जरांगे जाणारच; ‘आंदोलनस्थळी मरेन, पण सरकारपुढे गुडघे टेकणार नाही’

IND vs AFG: पहिल्या T20I पूर्वी 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम्' का वाजवलं गेलं? जाणून घ्या ऐतिहासिक घटनेमागचं कारण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

Maharashtra School Recruitment: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! राज्यात २८ हजारांहून अधिक पदे भरण्याचा मार्ग मोकळा, शिक्षकेतर भरतीचे नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT