LOCKDOWN.jpg 
सोलापूर

रविवारपासून आठ दिवस माढयात कडक जनता कर्फ्यू 

किरण चव्हाण

माढा(सोलापूर): माढा नगरपंचायत पदाधिकाऱ्यांसमवेत व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत उत्फूर्तपणे रविवारपासून (ता. 19) आठ दिवस माढयात जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. 
माढा तालुक्‍यातील काही गावांत कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

या पार्श्वभूमीवर माढयात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून माढा नगरपंचायतीच्या सहकारमहर्षी गणपतराव साठे सभागृहात नगरपंचायत पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी यांची बैठक झाली. याबाबत नगरपंचयातीने केलेल्या आवाहनाला सर्वांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. 

रविवारी (ता. 19) ते रविवारी (ता. 26) असे आठ दिवस जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. अत्यावश्‍यक सेवांमध्ये दुध व पाणी सकाळी सात ते नऊ आणि रात्री सात ते नऊ या वेळेत नागरिकांना उपलब्ध करून घेता येईल. कृषी सेवा केंद्रे सकाळी नऊ ते बारापर्यंत सुरू राहणार आहेत. दवाखाने व मेडिकल दुकाने चोवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी नगराध्यक्षा ऍड. मीनल साठे, संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, मुख्याधिकारी डॉ, चरण कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमुल कादबाने, माजी नगराध्यक्ष राहुल लंकेश्वर, गंगाराम पवार, प्रभाकर जाधव, सभापती कल्पना जगदाळे, नगरसेविका सुप्रिया बंडगर व व्यापाऱ्यांनी सहकार्य केले आहे.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT